
१. साधिका करत असलेल्या सेवेऐवजी तिच्या मनात दैनिक ‘सनातन प्रभात’ सेवेशी संबंधित संपादकीय सेवा शिकण्याचे विचार पुनःपुन्हा येणे
‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठ संरचना करणे, त्यातील छायाचित्रांशी संबंधित सेवा करणे आणि विशेषांकांची संरचना करणे आदी कलेशी संबंधित सेवा करते. मला लहानपणापासून ‘कला सादरीकरण’ या विषयाची आवड नाही, तरीही देवाच्या कृपेने या सेवा करतांना मला आनंद मिळतो. ‘मला पत्रकारितेची आवड असल्यामुळे माझ्या मनात दैनिक ‘सनातन प्रभात’ सेवेशी संबंधित असलेली संपादकीय सेवा शिकावी’, असा विचार पूर्वीपासून अधून-मधून यायचा.
२. साधिकेने स्वतःला दृष्टीकोन देणे, तरीही तिच्या मनात ‘संपादकीय सेवा शिकूया’, असा विचार पुनःपुन्हा येणे आणि तिला ‘संतांचे मार्गदर्शन घ्यायला हवे’, असे देवाने सुचवणे

मी ‘साधना आणि सेवा करतांना स्वेच्छा नको. सध्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठसंरचनेची सेवा करणारे साधक अल्प आहेत. आता आपत्काळ जवळ आला आहे. नवीन सेवा शिकायला वेळ द्यायला नको’, असे दृष्टीकोन ठेवून मी त्या विचाराकडे दुर्लक्ष करत असे. माझ्या मनात संपादकीय सेवा शिकण्याचा विचार येण्याचे प्रमाण न्यून झाले; मात्र त्यासंबंधी विचार पूर्णपणे माझ्या मनातून जात नव्हता. नंतरच्या कालावधीत माझ्या मनात ‘आपण संपादकीय सेवा शिकूया’, असा विचार येण्याचे प्रमाण वाढले. त्याकडे मी दुर्लक्ष करत होते. माझ्या मनात तो विचार येण्याचे प्रमाण वाढल्यावर ‘त्याविषयी संतांचे मार्गदर्शन घ्यायला हवे’, असे मला देवाने सुचवले. त्याप्रमाणे मी पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत, वय ५१ वर्षे) यांच्याशी बोलले.
३. पू. संदीप आळशी यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्याचा साधिकेला झालेला लाभ
३ अ. ‘आपल्याला येते किंवा आवडते, ती सेवा करण्यापेक्षा आपल्या साधनेसाठी आणि गुरुकार्य होण्यासाठी आवश्यक असलेली सेवा करणे अधिक योग्य आहे.
३ आ. आता आपत्काळ चालू आहे. साधना आणि गुरुकार्य करण्यासाठी वेळ अल्प आहे. आता नवीन सेवा शिकण्यासाठी वेळ देण्यापेक्षा सध्या आवश्यक असलेल्या सेवा पूर्ण करण्याला प्राधान्य द्यायला हवे.
३ इ. असे असले, तरीही नंतर आश्रमात साधकसंख्या उपलब्ध झाल्यास, परिस्थितीनुसार आणि ईश्वरेच्छेने तू संपादकीय सेवा शिकण्याचा विचार करू शकतेस.’
३ ई. ‘गुरूंनी कोणतीही सेवा दिली, तरीही ती झोकून देऊन आणि पूर्णपणे ईश्वरेच्छा समजून करायला हवी !’, हा विचार अधिक दृढ होणे : या विचारांवर मी पूर्वी माझ्या स्तरावर मात करत असे. त्यामुळे ते विचार काही काळ थांबत असत; पण पुन्हा कालांतराने येत असत. याविषयी पू. संदीपदादांचे मार्गदर्शन घेतल्यापासून माझ्या मनात नवीन सेवा शिकण्याचे विचार येत नाहीत. आता माझा ‘गुरूंनी कोणतीही सेवा दिली, तरीही ती झोकून देऊन आणि पूर्णपणे ईश्वरेच्छा समजून करायला हवी’, हा विचार अधिक दृढ झाला आहे, तसेच ‘साधनेत संतांचे मार्गदर्शन घेणे किती महत्त्वाचे आहे !’, हे देवाच्या कृपेने मला अनुभवता आले.
मी गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि पू. संदीप आळशी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. आनंदी अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !