Honduras Violence : मध्य अमेरिकेतील होंडुरास या देशात झालेल्या गोळीबारात २५ जणांचा मृत्यू

सिगाल्पा (होंडुरास) – मध्य अमेरिकेतील होंडुरास या देशात नुकत्याच झालेल्या २ वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांत आतापर्यंत किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६ पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

१. पहिले आक्रमण ट्रूजिलो भागातील एका शेतात झाले. या आक्रमणात बंदूकधार्‍यांनी कामगारांवर बेछूट गोळीबार केला. या आक्रमणात १९ जण ठार झाले. येथे पर्यावरण आणि भूमीचा अधिकार यांसाठी आवाज उठवणार्‍यांना यापूर्वीही धमक्या मिळत होत्या.

२. दुसरी घटना ग्वाटेमाला सीमेवजळ ओमोआ भागात घडली. येथे बंदूकधार्‍या गुन्हेगारांनी पोलीस पथकावर आक्रमण केले. या आक्रमणात एका वरिष्ठ अधिकार्‍यासह ६ पोलीस कर्मचारी ठार झाले.