सरन्यायाधिशांच्या वक्तव्याला विरोध करण्यासाठी चालू झाली होती मोहीम

नवी देहली – सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी बेरोजगार तरुणांना ‘कॉकरोच’ (झुरळ) म्हटल्याचे काही लोकांनी भांडवल करत विरोध चालू केला आहे. वाढता विरोध पहाता सरन्यायाधिशांनी त्यावर स्पष्टीकरण देत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे सांगितले. तथापि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अभिजीत दीपक नावाच्या विदेशात रहाणार्या व्यक्तीने एक्सवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे खाते उघडले. त्याद्वारे तिने भाजप सरकार, भारतीय लोकशाही, न्यायव्यवस्था आदींवर उपरोधिक टीका केली. केवळ ६ दिवसांत या खात्याला १ लाख ९३ सहस्र अनुयायी (फॉलोवर्स) मिळाले. आता या खात्यावर बंदी आणण्यात आली आहे.
🚨 BAN THE BLOT ON DEMOCRACY! 🚨
The X account of the ‘Cockroach Janata Party’ which launched a malicious campaign against the Chief Justice, has been banned in India.
Such accounts that blemish Indian democracy shouldn't just be banned here, but globally!
The MEA and Ministry… pic.twitter.com/nDep6bGACP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 22, 2026
‘एक्स’ने या कारवाईविषयी सांगितले की, भारतातील स्थानिक नियम, न्यायालयाचा आदेश आणि कायदेशीर तक्रारी यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. ‘कॉकरोच जनता पक्षा’चे घोषवाक्य सांगतांना ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी’, अशा प्रकारे त्याचे बोधचिन्ह (लोगो) सिद्ध करण्यात आला होता.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !