‘१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी मुंबई येथील नर्दुल्ला टँक मैदानात सनातन संस्थेच्या वतीने श्री राजमातंगी महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहातांना मला मे २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आठवण येत होती.
२. यज्ञ चालू होण्यापूर्वी श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर जाणवलेली सूत्रे
२ अ. ज्योतिर्लिंग, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे देवद आश्रमातील वातावरण चैतन्यमय अन् उत्साही होणे : यज्ञ चालू होण्यापूर्वी श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह यज्ञस्थळी आगमन झाले. त्या वेळी ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वातावरणात आमूलाग्र पालट झाला’, असे मला जाणवले. तेव्हा ज्योतिर्लिंग, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या अस्तित्वामुळे वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्याच वेळी मंगल वाद्यांचे वादन चालू होते. या सर्वांमुळे एकंदरीत सर्वांच्या उत्साहात वाढ झाली.
२ आ. माझ्या अंगावर रोमांच आले.
२ इ. भाव जागृत होणे : ज्योतिर्लिंग आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अत्यंत तेजस्वी रूपातील दर्शनामुळे माझा भाव बराच वेळ जागृत होता आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते.
२ ई. ‘हा अद्वितीय आणि अवर्णनीय सोहळा संपू नये’, असे मला वाटत होते.

३. कुंकूमार्चनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. साधारण दुपारी ४.५० वाजता उपस्थित यजमानांकडून कुंकूमार्चन करण्यास आरंभ झाला. त्यापूर्वी यज्ञकुंडाच्या वरच्या बाजूला सूक्ष्मातून मोठ्या प्रमाणात देवतांची उपस्थिती असल्याचे मला जाणवले.
आ. या देवतांकडून आकाशी रंगाचा प्रकाशझोत यज्ञाच्या दिशेने जातांना मला दिसला.
इ. त्या देवतांमधील अनेक देवतांचे मुखमंडल हे श्रीकृष्णाप्रमाणे निळसर सावळ्या रंगाचे होते.
४. यज्ञाच्या आरंभी, मध्यात आणि शेवटी जाणवलेली सूत्रे
अ. यज्ञाच्या आरंभाच्या पर्वात मला उत्साह आणि आनंद जाणवत होता.
आ. मधल्या वेळी मला तारक तत्त्वाची, भावाची स्पंदने जाणवली.
इ. ‘यज्ञाच्या शेवटच्या सत्रात पुरोहित विविध हविर्द्रव्ये यज्ञकुंडात अर्पण करत असतांना मारक तत्त्व कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले.
५. ‘कार्यक्रम उच्च आध्यात्मिक स्तरावर झाल्याने सर्वांवर कार्यक्रमाचा प्रभाव पुष्कळ मोठ्या प्रमाणात झाला’, असे जाणवणे
‘कार्यक्रमाच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि सभागृहाची भव्य, आकर्षक अन् सुंदर रचना, अत्यंत उत्कृष्ट आयोजन, उच्च गुणवत्तेचे ध्वनी-चित्रीकरण, यांमुळे सर्वांवर कार्यक्रमाचा प्रभाव पुष्कळ मोठ्या प्रमाणात झाला’, असे मला जाणवले.’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०२६)
कळवा (ठाणे) येथील श्रीमती प्रीती प्रमोद शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वहिनी, वय ६५ वर्षे) यांना श्री राजमातंगी महायज्ञाचे थेट प्रक्षेपण पहातांना जाणवलेली सूत्रे !
‘माझ्या वहिनी श्रीमती प्रीती प्रमोद शिंदे (वय ६५ वर्षे) या कळवा (ठाणे) येथून यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात होत्या. यज्ञ पूर्ण झाल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘मी पहिल्यांदाच असा कार्यक्रम सलग ५ घंटे पाहिला. यज्ञाचे आयोजन पुष्कळ उत्कृष्ट होते. यज्ञ, तेथील वातावरण आणि मंत्रोच्चार यांमुळे मी प्रभावित झाले. ‘कार्यक्रम सतत पहात रहावा’, असे मला वाटत होते. अन्य वेळी थोडा वेळ भ्रमणभाषवर कार्यक्रम पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणी येते; परंतु भ्रमणभाषवर हा कार्यक्रम पहातांना तसे काही झाले नाही. माझ्या मनाची अस्वस्थता आणि मरगळ निघून गेली. मला पुष्कळच उत्साही आणि शांत वाटत आहे. ‘घरातील वातावरणात सकारात्मक स्पंदने वाढली आहेत’, असे मला जाणवले.’’ – (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०२६)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !