१७ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत ‘गंगा दशहरा’ आहे. त्या निमित्ताने…
‘गंगा नदी ही विश्वातील समस्त पावित्र्याचे प्रतीक आहे. सत्ययुगात वैशाख शुक्ल सप्तमीला गंगादेवीची उत्पत्ती झाली. त्यानंतर गंगापूजनाची प्रथा चालू झाली. यावर्षी १७.५.२०२६ या दिवशी ‘गंगा दशहरा’ चालू होऊन तो २५.५.२०२६ या दिवशी समाप्त होणार आहे.
६.५.२०२६ या दिवशी सकाळी मी नामजप करत असतांना अकस्मात् माझे श्री सरस्वतीदेवीशी अनुसंधान चालू झाले. तिने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि मला आशीर्वाद दिला. तिने आशीर्वादाच्या स्वरूपात सूक्ष्म विचारांद्वारे गंगा नदीविषयीचे ज्ञान माझ्याकडे प्रवाहित केले. तेव्हा मला गंगा नदीविषयी उमगलेली ज्ञानसूत्रे मी येथे लेखबद्ध केली आहेत. यातील काही सूत्रे आपण १९ मे या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे येथे देत आहे.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1041505.html

४. कुक्कुटस्वामींचे माहात्म्य आणि गंगा, यमुना अन् सरस्वती यांचा सेवाभाव !
‘जेव्हा परम विठ्ठलभक्त पुंडलिक त्याच्या माता-पित्यांना शोधत एका स्थळी पोचतो, तेव्हा त्याला एक चमत्कार पहाण्यास मिळतो. तेथील कुक्कुटस्वामींच्या आश्रमात गंगादेवी, यमुनादेवी आणि सरस्वतीदेवी नारीचे रूप धारण करून स्वच्छता करत असतात. जेव्हा पुंडलिक त्यांना याविषयी विचारतो, तेव्हा त्या तिन्ही नद्या सांगतात, ‘‘कुक्कुटस्वामींनी त्यांच्या माता-पित्यांची सेवा करून ब्रह्मर्षिपद प्राप्त केले आहे. जेव्हा आम्हा नद्यांना मनुष्याचे पाप सहन करणे अशक्य होते, तेव्हा आम्ही नद्या कुक्कुटस्वामींच्या आश्रमात येऊन तेथे स्वच्छता करतो. आमच्या या कर्मामुळे आम्हावर कुक्कुटस्वामींची कृपा होऊन आमची मलीनता नष्ट होते आणि आम्ही पवित्र होऊन पुन्हा आमच्या स्थानी परततो.’’ हा चमत्कार पाहून भक्त पुंडलिक प्रभावित होतो आणि तो त्याच्या माता-पित्यांची सेवा करण्यासाठी प्रेरित होतो. यातून ‘गंगा, यमुना आणि सरस्वती या दिव्य नद्या किंचितही अहं न जोपासता साधू-संत अन् ऋषिमुनी यांच्या सेवेत अविरत कार्यरत असतात’, ही शिकवण आपल्याला मिळते.
५. वर्षातील विशिष्ट मासात विशिष्ट नदीत स्नान केल्याने भाविकांना होणारे लाभ !

६. लघु रूपातून विराट रूपात परिवर्तित झालेली गंगा नदी !
हिमालयातील गंगोत्रीमध्ये उगम पावलेली गंगेची बोटभर जाडीची अरूंद धारा बंगालच्या महासागराजवळ सागराप्रमाणे विशाल रूप धारण करून ‘गंगासागर’, या नावाने विख्यात होते. उत्तरकाशी येथील गंगोत्रीपासून हरिद्वार, हृषिकेष इत्यादी गंगेची तीर्थस्थाने प्रसिद्ध आहेत. तीर्थराज प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्हींचा त्रिवेणी संगम आहे. सूक्ष्म आणि मर्यादित असणारी गंगा पृथ्वीवर स्थुलातून अवतीर्ण होऊन विशाल रूप धारण करते. गंगादेवीने जनकल्याणासाठी केलेली ही दैवी लीलाच आहे.
७. देवलोकातील गंगादेवीचे पृथ्वीवर प्रथम गंगा नदीत रूपांतर झाले आणि त्यानंतर ती सर्वांचा प्रतिपाळ करून त्यांना मुक्ती देणारी ‘गंगामाता’, या नावाने विख्यात झाली.
गंगामातेच्या चरणी वहाते ही भावसुमनांजली ।

दिव्य कांती रविसमान । मंजुळ वाणी वीणेसमान ।
कोमल काया फुलासमान । सात्त्विक सौंदर्य शारदेसमान ।। १ ।।
गंधर्वांची स्वरगंगा । हिमवानची हेमगंगा ।
हिरण्यमय कांचनगंगा । वात्सल्यमय प्रेमगंगा ।। २ ।।
मुक्तीदायिनी ज्ञानगंगा । मोक्षदायिनी भक्तीगंगा ।
प्राणदाियनी जीवनगंगा । आनंददायिनी भावगंगा ।। ३ ।।
ब्रह्मपुत्री पापमोचनी, पतितपावन मंदाकिनी ।
भागीरथी विश्वजननी । गंगा नदी त्रिपथगामिनी ।। ४ ।।
जो करतो गंगेत पवित्र स्नान । त्यास देते गंगा मुक्तीचे दान ।।
गंगामातेचा त्याग किती महान । तिने केले विश्वकल्याण ।। ५ ।।
– सुश्री मधुरा भोसले
८. आकाशगंगेतील पवित्र जलाने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर जलाभिषेक हाेणे

गंगा नदी ही स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांच्यासह समस्त ग्रहमंडल व्यापणारी आकाशगंगा आहे. आकाशगंगेच्या स्वरूपात ती दिव्यतम आहे. ती श्रीविष्णूचे तेजस्वी पांढर्या रंगाचे तेज धारण करते आणि ब्रह्मांडात अनेक आकाशगंगांचे विराट रूप धारण करून निरंतर प्रवाहित होत असते.
त्रेतायुगात आकाशगंगेतील जलाने हनुमानाने प्रभु श्रीरामावर अभिषेक केला होता. द्वापरयुगात जेव्हा श्रीकृष्ण ७ दिवस गोवर्धन पर्वत धारण करतो, तेव्हा इंद्राचा अहंकार नष्ट होऊन तो श्रीकृष्णाला शरण येतो. त्यानंतर देवराज इंद्र आकाशगंगेतील जलाने श्रीकृष्णावर अभिषेक करतो.
९. कृतज्ञता आणि प्रार्थना
मी गंगामातेच्या चरणी भावपूर्णरित्या कृतज्ञता अर्पण करते. ‘अशा या परम पवित्र गंगामातेने आम्हा साधकांवर कृपा करून आम्हाला ज्ञानगंगा आणि भक्तीगंगा यांत न्हाऊ घालून आम्हालाही मुक्ती द्यावी’, अशी गंगामातेच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ७.५.२०२६, वेळ : सकाळी १०.२० ते ११, कालावधी : ४० मिनिटे)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
उपशास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय संगीत यांतील भेद !