बहुराष्ट्रीय आस्थापनांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतराचा कट रोखा !

हिंदु जनजागृती समितीचे जयपूरमध्ये मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या नावे प्रशासनाला निवेदन

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

जयपूर (राजस्थान) – बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये हिंदु महिला कर्मचार्‍यांना लक्ष्य करणारी मानसिकता आणि संघटित ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने जयपूर प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री भजन लाल शर्मा अन् राष्ट्रीय महिला आयोग यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये समोर आलेल्या हृदयद्रावक घटनांचा हवाला देत समितीने म्हटले की, कॉर्पोरेट जगतात हिंदु महिलांचे शोषण करणे, त्यांना बळजोरीने नमाजपठण करण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडणे, हा एका मोठ्या ‘धार्मिक आतंकवादा’चा भाग आहे, जो आता सहन केला जाणार नाही.

समितीने जयपूरचे जिल्हाधिकारी संदेश नायक यांच्या माध्यमातून मागणी केली की, जयपूर आणि संपूर्ण राजस्थानमध्ये कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्येही अशा प्रकारच्या घटनांची त्वरित चौकशी करण्यात यावी. तसेच सरकारने आस्थापनांमध्ये ‘धार्मिक भेदभाव विरोधी परीक्षण चालू करावे आणि महिलांच्या साहाय्यासाठी विशेष हेल्पलाईन सिद्ध करावी’, जेणेकरून पीडित महिला कोणत्याही भीतीविना तक्रार नोंदवू शकतील. ‘कॉर्पोरेट’च्या नावाखाली हिंदु महिलांचे शोषण आणि धर्मांतराचा खेळ आता थांबला पाहिजे, अशा कडक शब्दांत समितीने चेतावणी दिली.

याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, समितीच्या शुभ्रा भार्गव; भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीनारायण शर्मा; हिंदु जागरण मंचचे प्रांत सदस्य अधिवक्ता राजकुमार, जिल्हा विधी प्रमुख डॅनी मिश्रा, महिला सहसंयोजिका अधिवक्ता अनुपमा चतुर्वेदी; ‘श्रुति-स्मृति अनुसंधान फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सिद्धार्थ उपाध्याय; ‘सेंटर फॉर सनातन रिसर्च’चे प्रदेश सरचिटणीस श्री. प्रकाश शर्मा; सनातन संस्थेच्या आशा राठी, ऋचा पंवार आदी उपस्थित होते.