कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात आलेला अनुभव

श्री महालक्ष्मी मंदिर

१. हिंदु चालकाने भाडे नाकारणे; मात्र मुसलमान गाडीचालकाने अल्प पैशात नियोजित स्थळी सोडणे

‘२४.१.२०२६ या दिवशी आम्ही (४ साधिका) कोल्हापूर येथीलश्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात गेलो होतो. मंदिरातून परत येतांना आम्ही रिक्शासाठी थांबलो होतो. त्या वेळी एक रिक्शावाला थांबला; पण त्यानंतर तिथे दुसरा रिक्शावाला आला. त्याने आम्हाला अधिक पैसे सांगितले. मग पहिल्या रिक्शावाल्याला ‘आम्हाला नेणार का ?’, असे विचारले. तेव्हा त्याने सरळ ‘नाही’, सांगितले आणि दुसरा मुसलमान रिक्शावाला पैसे कमी करून आम्हाला जायच्या ठिकाणी सोडायला सिद्ध झाला. त्या रिक्शावाल्याशी बोलत असतांना आमच्या लक्षात आले की, तो मुसलमान आहे. (म्हणजे त्याने सांगितले.) तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, पैसे अल्प दिले, तरी मुसलमान लोक स्वीकारतात. ते रिक्शाचालक असू दे, नाही तर टॅक्सीचालक असू दे. ते आपले भाडे सोडत नाहीत; पण जो हिंदु होता, त्याला आम्ही ‘तू नम्रतेने बोलायला हवेस’, असे सांगितल्यामुळे त्याची आमचे भाडे स्वीकारण्याची सिद्धता नव्हती.

२. अन्य धर्मियांनी हिंदु धर्माचा अभ्यास करून हिंदूंचा बुद्धीभेद करणे आणि त्याला हिंदू फसणे

त्यानंतर त्या मुसलमान रिक्शावाल्याशी बोलत असतांना काही सूत्रे समजली. त्यामध्ये त्याने आम्हाला सांगितले की, मुसलमानांच्या वस्तीत एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये त्याच्या आईने त्याला शिकायला घातले नाही; कारण त्या शाळेमध्ये मुले हुशार नसली, तरी त्यांना पुढच्या वर्गामध्ये ढकलतात किंवा उत्तीर्ण करतात. चांगले शिक्षण नसल्यामुळे आईने त्याला दुसर्‍या चांगल्या शाळेमध्ये घातले. तिथे ९० टक्के हिंदु ब्राह्मण मुले शिकतात. त्या माणसाने आम्हाला सांगितले की, त्यामुळे माझा हिंदु धर्माचा अभ्यास चांगला झाला आहे. त्याने आम्हाला विचारले, ‘श्री महालक्ष्मी मंदिर हे अंबाबाईचे आहे. हे कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे महालक्ष्मीचे नसून अंबाबाईचे मंदिर आहे.’ त्यात त्याने आम्हाला विचारले, ‘तुम्हाला शक्तिपीठे कशी निर्माण झाली, हे ठाऊक आहेत का ?’ मग आम्ही सांगितले, ‘हो. पार्वतीच्या देहाच्या अवयवांपासून निर्माण झालेली जी स्थाने आहेत, ती म्हणजे शक्तिपिठे.’ तेव्हा त्याने सांगितले, ‘हो. मग श्री महालक्ष्मी तर श्रीविष्णूची पत्नी आहे. मग हे शक्तिपीठ कसे काय आहे ? ती अंबाबाई असायला हवी. याचा अभ्यास हिंदूंना नाही.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘हिंदूच धर्माचा अभ्यास करत नाहीत.’’ या प्रसंगातून पुढील ३ गोष्टी माझ्या लक्षात आल्या

अ. व्यवसाय होण्यासाठी मुसलमान काहीही करू शकतात.

आ. अन्य धर्मीय हिंदु धर्माचा सखोल अभ्यास करतात.

इ. हिंदू स्वधर्माविषयी सजग नाहीत.’

– एक साधिका (३.२.२०२६)