
ढाका (बांगलादेश) – बकरी ईद निमित्त बांगलादेशात बळीसाठी विक्रीसाठी असलेल्या रेड्यांना ‘डॉनल्ड ट्रम्प’ आणि ‘बेंजामिन नेतान्याहू’ अशी नावे ठेवण्यात आली आहेत. हे दोन्ही ‘अल्बिनो’ (गुलाबी-पांढर्या) प्रजातीचे आहेत. त्यांना ईदनिमित्त विक्रीसाठी नारायणगंज येथील शेतात ठेवण्यात आले आहे. ‘ट्रम्प’ नावाच्या रेड्याचे वजन सुमारे ७०० किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चेहर्यावर असलेले सोनेरी रंगाच्या केसांचे पुंजके ट्रम्प यांच्या प्रसिद्ध केशरचनेची आठवण करून देतात.
🇧🇩 Buffaloes named “Trump” and “Netanyahu” reportedly set aside for Bakri Eid sacrifice in Bangladesh.
One buffalo named “Trump” has already been sold for 3,85,000 Bangladeshi taka – nearly ₹3 lakh in Indian currency.
Ironically, the same US establishment that played a major… pic.twitter.com/CC1mDHJqA3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 19, 2026
रेडा प्रसिद्ध झाल्यामुळे मालक जियाउद्दीन अतिशय आनंदी आहे. त्याने म्हटले की, त्याच्या भावाने रेड्याच्या अनोख्या ठेवणीवर लक्ष दिले आणि त्याला ‘ट्रम्प’ असे नाव दिले. तर दुसर्या रेड्याचे नाव ‘नेतान्याहू’ ठेवले गेले. ‘ट्रम्प’ रेडा अतिशय शांत आणि विनम्र आहे, जो डॉनल्ड ट्रम्प यांच्या स्वभावाशी अजिबात जुळत नाही.
जियाउद्दीन यांचे म्हणणे आहे की, ‘नेत्यानाहू’ रेड्याच्या रागीट हालचाली इस्रायली पंतप्रधानांच्या प्रतिमेशी मिळत्याजुळत्या आहेत, म्हणूनच त्याला हे नाव देण्यात आले. ट्रम्प नावाचा रेडा आधीच ३ लाख ८५ सहस्र टकांना (बांगलादेशी चलन – ३ लाख भारतीय रुपयांना) विकला गेला आहे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता