२५० मुसलमानांच्या जमावाने पोलिसांवर केली दगडफेक
पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार
कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजप सरकारने रस्त्यावर नमाजपठण करण्यास बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ येथील पार्क स्ट्रीट परिसरात मुसलमानांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी ते हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
१७ मे या दिवशी प्रशासनाकडून परिसरात अवैध बांधकामावर बुलडोझर कारवाई केली जात होती. याच वेळी रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून वाद चालू झाला. २५० पेक्षा अधिक मुसलमान आंदोलकांनी कारवाईला विरोध केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी रस्ता रोखून धरला आणि निषेध व्यक्त करत लोकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी पोलीस आणि मुसलमान यांच्यात धक्काबुक्कीही झाली. बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांनी परिसराला वेढा घातला. अतिरिक्त सुरक्षा दल पाचारण करण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसक चकमकीत ३ पोलीस कर्मचारी घायाळ झाले.
🚨 Kolkata on Edge: Anti-Encroachment Drive Sparks Violent Street Clashes
Violent protest erupted in Kolkata's Park Circus over offering Namaz on public roads and action against encroachments.
A mob of nearly 250 Muslims pelted stones at the police, leaving 3 policemen injured… pic.twitter.com/7NDKiAOaUf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2026
कायदाद्रोही मुसलमानांना पाठीशी घालणारा माकप !
माकपचे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे) नेते महंमद सलीम म्हणाले की, सरकारचा निर्णय असा नसावा की, जनता रस्त्यावर येईल. (रस्त्यावर नमाजपठण करणे हा सरकारचा निर्णय आहे, असे सलीम यांना म्हणायचे आहे का ? – संपादक) लोकांनी निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लोक पालटाची मागणी करत आहेत. परिस्थिती अधिक बिघडावी यासाठी हे झालेले नाही. सरकारने आता परिस्थिती सुधारायला हवी. लोकांनी शांतता आणि सुव्यवस्था यांसाठी मतदान केले आहे. जर हे तोडले गेले, तर लोक रस्त्यावर येणारच. (कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हिंदूंनी मतदान केले आहे आणि त्यानुसारच बंगालमधील भाजप सरकार काम करत आहे. जे कुणी याच्या विरोधात रस्त्यावर येणार असतील, तर यांचा योग्य बंदोबस्त केला जाणारच, हेच या घटनेतून लक्षात येते ! – संपादक)

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !