हिंदूंच्या विरोधानंतर शिक्षिका हिबा फातिमा हिची नोकरीवरून हकालपट्टी

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील मदर तेरेसा उच्च माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता ६ वीच्या एका विद्यार्थ्याला केवळ कपाळावर टिळा लावून शाळेत आल्यामुळे मारहाण करण्यात आली. शिक्षिका हिबा फातिमा हिने विद्यार्थ्याला टिळा पुसायला लावला आणि त्याला थप्पडही मारली, असा आरोप आहे.
Kanpur Tilak Controversy: A student who came to a convent school wearing a tilak was beaten by a Muslim teacher.
Following protests by Hindus, the teacher, Hiba Fatima, was dismissed from her job.
How many more years will this go on? Why doesn't the government appoint an… pic.twitter.com/nHtDAVDnOr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 19, 2026
या घटनेनंतर विद्यार्थी रडत घरी पोचला आणि त्याने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाळेत पोचले आणि शाळेबाहेर त्यांनी जोरदार निदर्शनेही केली. त्यांनी आरोपी शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली. पोलिसांच्या उपस्थितीत शाळा प्रशासन आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक घंटा चर्चा झाली. वाढत्या दबावानंतर शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर निदर्शने करणारे कार्यकर्ते शांत झाले. (याचा अर्थ जर हिंदुत्वनिष्ठांनी या प्रकारावर आक्षेप घेतला नसता, तर केवळ कुटुंबियांच्या तक्रारीवरून शाळा आणि पोलीस यांनी कोणतीच कारवाई केली नसती. हिंदूंनो, यातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महत्त्व लक्षात घ्या आणि त्यांचे साहाय्य घेण्यासमवेतच त्यांच्या पाठीशी उभे रहा ! – संपादक)
अभाविपचे महानगर मंत्री सुधांशु त्रिपाठी म्हणाले की, टिळा सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या धार्मिक प्रतीकामुळे छळणे चुकीचे आहे.
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !