
बीरभूम (बंगाल) – बंगालमध्ये भाजप सत्तेत येताच बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे असलेल्या ‘श्री श्री राधा गोविंद मंदिरा’च्या भोगघरावरील तृणमूल काँग्रेसचे नियंत्रण हटवण्यात आले. भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक लोक यांच्या साहाय्याने तेथे चालणारे तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यालय बंद करण्यात आले असून ती जागा पुन्हा मंदिर समितीच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

या मंदिराची स्थापना वर्ष १९९० मध्ये परिसरातील लोकांनी वर्गणी जमा करून केली होती. हे मंदिर दीर्घकाळापासून भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. त्यानंतर मंदिराशेजारी भोगघराचे बांधकाम चालू करण्यात आले होते. तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी बांधकामाचे काम थांबवून त्या जागेवर नियंत्रण मिळवले आणि तिथे पक्षाचे कार्यालय चालू केले होते.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin