‘ट्रॅव्हल जिहाद’चा बीमोड करायला हिंदूंनी एकत्र यावे ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनआक्रोश सभा !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – ‘लव्ह जिहाद’, ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि आता येणार्‍या ‘ट्रॅव्हल (प्रवास) जिहाद’चा बीमोड करायला हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदुविरोधी कृती करतांना १० वेळा विचार करायला लागला पाहिजे, अशी आपली संघटित शक्ती निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. ते पुलाची शिरोली येथे ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर या घटनांच्या निषेधार्थ आयोजित ‘हिंदु जनआक्रोश सभे’त बोलत होते.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, हिंदु युवतींवर अत्याचाराची प्रकरणे जिथे उघडकीस येतात, तिथे संबंधित तरुणांचा हिंदु समाजाने तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ यांच्या माध्यमातून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांना हिंदु समाजाने प्रत्युत्तर दिले पाहिजे. हिंदु युवती आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी हिंदु समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे.

या वेळी हिंदु धर्मरक्षक श्री. सागरभैय्या बेग यांनीही उपस्थितांना संबोधित केले.