
मुंबई, १४ मे (वार्ता.) – भारताच्या रक्षणासाठी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या श्री राजमातंगी महायज्ञाचा प्रसार मागील १ महिन्यापासून चालू आहे. यज्ञाला केवळ २ दिवस शेष राहिले आहेत. त्यामुळे प्रसाराप्रमाणेच महायज्ञाच्या भव्य मंडपाच्या उभारणीचे कार्यही युद्धपातळीवर चालू आहे. १६४ फूट रुंदी, ३७८ फूट लांबी आणि ५० फूट उंची असलेला आणि ५ सहस्र भाविक बसू शकतील असा भव्य मंडप उभारण्यात येत आहे.

यज्ञकुंड, व्यासपीठ, यज्ञमंडप, प्रदर्शन मंडप यांचे जवळजवळ ७५ टक्के काम पूर्ण झाले असून १५ मेपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

‘यज्ञाचा प्रारंभ श्री गणेश आवाहन, पुण्याहवाचन आणि महासंकल्प यांनी होईल. श्री राजमातंगीदेवीच्या मूलमंत्रांच्या जयघोषात आहुती अर्पण केल्या जातील. यज्ञाचे पौरोहित्य इरोड, तामिळनाडू येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती करतील तर शिवाचार्य श्री. गुरुमूर्ती हे यज्ञाचे मुख्य आचार्य असतील, असे पुरोहित अन् ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले.
सोमनाथ दिव्य अंशात्मक शिवलिंग दर्शन आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कक्ष विशेष !

चंद्राने स्थापित केलेले सोमनाथ मंदिरातील शिवलिंग धर्मांध गझनीने वर्ष १०२६ मध्ये तोडले. या शिवलिंगाचा अंशात्मक दिव्य भाग तेव्हापासून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यज्ञस्थळी हे अंशात्मक दिव्य शिवलिंग दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. या दिव्य शिवलिंगाच्या दर्शनाची भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी असणार आहे. यासह सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या विश्वकल्याणाच्या अद्वितीय विविधांगी कार्याची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनही असणार आहे.
यज्ञकुंडाची उभारणी शास्त्रानुसार करण्यात आली आहे. भाविकांना बसण्यासाठी आसंद्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी वातानुकूलन यंत्रे आणि कुलर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना जागेवरच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
| हे ही वाचा → Sanatan Sanstha Press Meet : भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ! |
यज्ञस्थळी असणार विविध प्रदर्शने !
सनातन संस्थेच्या अध्यात्मशास्त्र, धर्म, राष्ट्र, संस्कार, आयुर्वेद, व्यक्तीमत्त्व विकास आदी लोकप्रिय ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. औषधी वनस्पती आणि आपत्कालीन उपाययोजना यांची माहिती देणारा विशेष कक्षही असतील. सनातन संस्थेची २६ वर्षांची वाटचाल, हिंदु जनजागृती समितीचे कार्य, ‘सनातन प्रभात’ वृत्तपत्राचा राष्ट्र-धर्म कार्यातील परिणाम आदींची फ्लेक्सद्वारे माहिती देण्यात येईल. ही सर्व प्रदर्शने १३० फूट लांबी आणि ४० फूट रुंदी असलेल्या मंडपात असतील.
| हे ही वाचा → श्री राजमातंगीदेवीचे कार्य ! |
पूर्वनोंदणी अनिवार्य !
महायज्ञासाठी येणार्या भाविकांसाठी पूर्वनोंदणी अनिर्वाय आहे. यज्ञमंडपात प्रवेश करतांना भाविकांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. मंडपात प्रवेशासाठी २ प्रवेशद्वारे असतील. मान्यवर, तसेच माध्यमांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !