आष्टी (ता. खेड) येथील ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

खेड, १३ मे (वार्ता.) – तालुक्यातील आष्टी गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव खेम सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि कळशारोहण सोहळा, रायपाटण (ता. राजापूर) येथील महंत श्री गुरु १०८ ब.प्र. रविशंकर महाराज यांच्या शुभहस्ते भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. त्यानंतर महाराजांनी उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले. या वेळी ध्वजारोहण, रुद्र अभिषेक, हवन, पालखी नृत्य, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महंत श्री गुरु १०८ ब.प्र. रविशंकर महाराज म्हणाले, ‘‘आपल्या जीवनात धर्माचरणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आपली परंपरा आपणच जपली पाहिजे. प्रत्येकाने धर्माचरण आणि नामजप हे केलेच पाहिजे. ‘देवळात येतांना देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहोत’, असा भाव ठेवून देवळात देवदर्शनसाठी यावे. धर्माचरण आणि नामस्मरण केल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.’’
सनातनचे कार्य पुष्कळ चांगले ! – महंत श्री गुरु १०८ ब.प्र. रविशंकर महाराजमहंत श्री गुरु १०८ ब.प्र. रविशंकर महाराज यांना सनातन संस्थेचे साधक श्री. केशव अष्टेकर आणि श्री. प्रशांत अष्टेकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक आणि ‘सनातन पंचांग’ भेट देऊन आशीर्वाद घेतले. या वेळी महाराज म्हणाले की, सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. राजापूरमध्ये होणार्या ‘सनातन’च्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होत असतो. |
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !