
रत्नागिरी – मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मधील दुरुस्तीनुसार पुराव्यांचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कुळांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कुळांना न्याय मिळावा, असे निवेदन बहुजन विकास आघाडीच्या वतीने लांजा तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांना नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश भायजे आणि शिष्टमंडळाने तहसीलदारांशी सविस्तर चर्चा केली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांचा प्रलंबित प्रश्नाविषयी आणि गोरगरीब, कष्टकरी शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे फार मोठा संघर्ष केला. वर्ष २००२ आणि २००६ या वर्षी कुळ कायद्यातील कलम ४(२) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. तरीही अधिकारी वर्गाकडून कुळांना न्याय मिळकत नसल्याचे अनेक कुळांकडून सांगण्यात येत आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने दोन्ही जिल्ह्यांमध्ये सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात येणार आहेत.
बहुजन विकास आघाडीच्या यापूर्वीच्या आंदोलनामुळे ‘जर अशी व्यक्ती, सातत्याने ती जमीन कसत असल्याच्या तितकेच परिस्थितीजन्य साक्षी पुरावा असल्यास आणि त्या गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष अन् त्या व्यक्तीच्या जमिनीलगत लागून असलेल्या जमिनीचा लागवडदार, उक्त जमीन त्या व्यक्तीच्या कब्जात असल्याचे आणि त्या व्यक्तीकडून जी जमीन १२ वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अखंडीतपणे कसण्यात येत असल्याचे शपथपत्रावर कथन करत असतील, तर अशी व्यक्ती या कलमाच्या प्रयोजनांसाठी कुळ असल्याचे मानण्यात येईल.’, अशी मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मध्ये दुरुस्ती केली आहे. यानुसार कुळांना न्याय मिळावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
या वेळी लांजा तालुक्यातील कुळांच्या प्रश्नाविषयी बविआ नेते सुरेश भायजे, चंद्रकांत परवडी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अधिवक्त्या स्मिता मांडवकर, तालुकाध्यक्ष दिलीप चौगले, नंदकुमार आंबेकर, संभाजी काजरेकर यांनी बेदखल कुळांच्या प्रश्नासंदर्भात तहसीलदारांशी सविस्तर चर्चा केली आणि बेदखल कुळांच्या प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. निवेदन देण्यासाठी निवेदन देण्यासाठी प्रकाश मांडवकर, विलास दरडे, वसंत घडशी, संजय गोंधळी, आत्माराम करंबेळे, सुभाष मसणे, यशवंत घडशी, सुरेश गावडे, शांताराम गाडे, अजय नेमन, जयवंत खुलम, दीपक निवाते, काशिनाथ पोसकर, प्रभाकर सनगरे, रघुनाथ भितळे, संतोष चांदे, वसंत देवळेकर, मंगेश मोरे, हर्षद तरळ, संदीप घडशी तसेच तालुक्यातील बविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण