माहिती अधिकार कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या !

विरार (जिल्हा पालघर) – येथे पूर्वेतील शिरगाव परिसरातील खदानीत माहिती अधिकार कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडली. या आक्रमणात प्रभाकर पाटील किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले असून पोलीस अन्वेषण गतीने चालू आहे.

१२ मे या दिवशी दुपारी ही घटना घडली. आत्माराम पाटील हे मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासमवेत कारने या खदानीच्या परिसरात गेले असता त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

माहिती अधिकार कार्यकर्ते सुरक्षित नसतील, तर केवळ माहितीचा अधिकार देऊन काय उपयोग ?