स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक १४)
गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात आईचे आरोग्य, आहार, विचार आणि दिनचर्या यांचा थेट परिणाम गर्भाची वाढ अन् विकास यांवर होतो. आयुर्वेदात गर्भवती स्त्रीच्या संपूर्ण काळजीसाठी ‘गर्भिणी परिचर्या’ ही संकल्पना सविस्तर वर्णन केलेली आहे. या संकल्पनेनुसार योग्य आहार, दिनचर्या आणि मानसिक स्थैर्य राखल्यास निरोगी अन् सक्षम संतती प्राप्त होऊ शकते.
(लेखांक १४)
लेखांक १३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1036850.html

१. गर्भावस्थेत होणारे सामान्य पालट
गर्भधारणेनंतर शरिरात अनेक नैसर्गिक पालट होतात जसे की, मळमळ, उलट्या (विशेषतः पहिल्या त्रैमासिकात), थकवा आणि झोप अधिक प्रमाणात येणे, भूक न्यूनाधिक होणे, पाठदुखी, पाय सुजणे आणि मनःस्थितीतील पालट. हे पालट सामान्य असले, तरी योग्य काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो.
२. आयुर्वेदाचा दृष्टीकोन

अ. आयुर्वेदानुसार गर्भावस्थेत रस धातू आणि रक्त धातू यांचे पोषण अत्यंत महत्त्वाचे असते; कारण त्यावरच गर्भाची वाढ अवलंबून असते, तसेच अपान वात योग्य प्रकारे कार्यरत असणे आवश्यक असते.
आ. जर वात, पित्त किंवा कफ यांमध्ये असंतुलन निर्माण झाले, तर गर्भाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या काळात दोष संतुलन राखणे, ही मुख्य उपचार दिशा असते.
३. आयुर्वेदाच्या चिकित्सेत विचार करतांना
गर्भवती स्त्रीची काळजी घेतांना वैद्य स्त्रीची प्रकृती (वात, पित्त आणि कफ), गर्भावस्थेचा महिना (Monthwise care), पचनशक्ती (अग्नी), वजन अन् शारीरिक स्थिती, पूर्वीचा गर्भधारणा इतिहास, तसेच मानसिक स्थिती, अशा गोष्टींचा विचार करतात.
४. मुख्य उद्देश
गर्भ पोषण + दोष संतुलन + आईचे आरोग्य संरक्षण
५. गर्भिणी परिचर्या

टीप १ : ८ व्या मासात उपचार म्हणून बस्ती (वैद्यकीय सल्ल्यानुसार) घ्यावी.
टीप २ : ९ व्या मासात उपचार म्हणून योनी पिचु (योनी मार्गाच्या आरोग्याशी संबंधित एक उपचार) आणि स्निग्धता आवश्यक आहे.

६. आयुर्वेदानुसार आहार मार्गदर्शन
अ. काय घ्यावे ? : दूध, तूप (योग्य प्रमाणात), शिजवलेले ताजे अन्न, मूगडाळ, भात, खिचडी, फळे आणि हिरव्या भाज्या.
आ. काय टाळावे ? : अधिक तिखट, आंबट आणि तेलकट पदार्थ, जंक फूड (पिझ्झा, बर्गर), प्रक्रिया केलेले अन्न, उपाशी रहाणे किंवा अधिक खाणे
७. आयुर्वेदानुसार दिनचर्या आणि काळजी
पुरेशी विश्रांती घ्यावी, हलका व्यायाम / चालणे, ताण टाळणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि उशिरापर्यंत जागरण टाळावे.
८. औषधी आणि उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)
अ. शतावरी : गर्भ पोषण
आ. विदारीकंद : शक्ती वाढवते
इ. गुडुची : रोगप्रतिकारशक्ती वाढवते
ई. स्वतःहून औषधे घेऊ नयेत.
९. घरगुती उपाय (Safe & Practical)
सकाळी कोमट दूध, तुपाचा मर्यादित वापर, सौम्य प्राणायाम, ध्यान आणि सकारात्मक वातावरण.
१०. निष्कर्ष
गर्भावस्था ही आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. आयुर्वेदातील ‘गर्भिणी परिचर्या’ ही संकल्पना केवळ आहारापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जीवनशैलीचे मार्गदर्शन करते. योग्य महिन्यानुसार काळजी, संतुलित आहार, मानसिक स्थैर्य आणि वैद्यकीय सल्ला यांमुळे गर्भाचा विकास उत्तम प्रकारे होतो अन् प्रसुती सुरक्षित होते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, जिल्हा पुणे.
लेखांक १५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1041536.html
🪷‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !