२ मुसलमानांना अटक
पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा मुसलमान महिलांचा प्रयत्न
नागाव (आसाम) – पोलिसांनी जिल्ह्यातील एका भंगार गोदामावर धाड घालून मंदिरांमध्ये चोर्या करणार्या एका मोठ्या टोळीच्या कारवाया उघड केल्या आहेत. या टोळीमध्ये हमीद अली आणि त्याचा मुलगा अझहर उद्दीन हे प्रमुख होते. त्यांच्या मालकीच्या या गोदामातून पोलिसांनी मंदिरातून लुटलेल्या पितळीच्या घंटा, त्रिशूळ, मूर्ती आणि इतर अनेक हिंदु पुरातन वस्तूंची पोती जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या या साहित्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे समजते.
🚨 Assam Police raided the scrap unit of Hamid Ali and his son Azharuddin in Nagaon.
During the operation, idols, temple bells, trishuls (tridents), and other sacred Hindu objects worth crores of rupees allegedly stolen from temples were seized. 🛕🔔
Suspicion is mounting that… pic.twitter.com/zR7vmK2rkW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2026
१. पोलिसांनी रंगेहात पकडल्यानंतर आरोपी हमीद अलीने ‘मी अधिकृत व्यवसाय करतो आणि नियमित जी.एस्.टी. (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात् वस्तू आणि सेवा कर) भरतो’ असा दावा करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
२. पोलिसांनी ‘मंदिरांची विटंबना आणि पवित्र वस्तूंची लूट करणे हा कोणताही वैध व्यवसाय असू शकत नाही’, असे ठणकावून सांगितले.
३. हा केवळ चोरीचा माल नसून मंदिरांना लक्ष्य करणार्या एका मोठ्या संघटित गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचे प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे.
४. पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील काही महिलांनीही पोलिसांच्या वाटेत अडथळे निर्माण केले; मात्र पोलिसांनी या विरोधाला न जुमानता जप्तीची कारवाई केली.
५. या प्रकरणी हमीद अली आणि अझहर उद्दीन यांना अटक करण्यात आली असून यामागे आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे ?, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
६. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून मंदिर चोरीच्या अनेक प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !