२३.४.२०२६ या दिवशी बेळगाव येथील दिलीप कागवाड (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६८ वर्षे) यांचे निधन झाले. ५.५.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त बेळगाव येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सौ. अर्चना घनवट, बेळगाव
१ अ. गुणवैशिष्ट्ये
१. ‘दिलीप कागवाडकाकांना तीव्र शारीरिक त्रास असतांनाही ते व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न प्रतिदिन पूर्ण करत असत.
२. काकांचे पथ्याचे जेवण बनवून त्यांच्या पत्नी आशा कागवाडकाकू सकाळी ११ वाजता प्रसारसेवेला जात असत. काका घरी एकटेच असायचे, तरी याविषयी काकांचे कधीच गार्हाणे नव्हते.
३. काका नेहमी स्थिर, शांत आणि तेजस्वी दिसत असत.
४. एकदा काका आणि काकू विदेशात जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा साधक त्यांना भेटायला गेल्यावर साधकांना पाहून काकांची भावजागृती झाली होती.
५. काका सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयीचे प्रवचन भ्रमणभाषवर सतत ऐकत असत. एकदा काका मला म्हणाले, ‘‘गुरुदेवांचे प्रवचन प्रतिदिन ऐकल्याने माझे शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित आहे.’’
६. गुरुदेवांविषयी बोलतांना काकांचा भाव जागृत होत असे.
१ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ‘काका गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले.
२. बराच वेळ मला तेथे सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले.’
२. सौ. अर्चना घनवट आणि सौ. शीतल जोशी, बेळगाव
२ अ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ‘कागवाडकाकांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा काकांचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता, तसेच त्यांची त्वचा पिवळी दिसत होती.
२. त्यांच्या घरात शांतता जाणवत होती.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.४.२०२६)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद