‘एक साधक एका साधूच्या नादी लागला; परंतु नंतर तो साधू भोंदू असल्याचे त्याच्या लक्षात आले. कल्याणचे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी काळी विद्या जाणणार्या त्या साधूच्या विळख्यातून साधकाची कशी सुटका केली, याची ही ‘चक्षुर्वै सत्यम् ।’ म्हणजे ‘जे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसते, तेच सत्य आहे’, अशी रोमांचक कथा आहे. ४ मे २०२६ या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1036520.html

२. प.पू. दादाजी वैशंपायन यांची दैवी लीला आणि भोंदू साधूपासून सुटका
२ अ. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या वहीत काकांचे काम लिहिणे : काकांकडून आलेल्या दिवशीच जेवण झाल्यावर आईने हा प्रकार आम्हाला सांगितला. हे ऐकून आम्हाला आठवण झाली, ती योगतज्ञ दादाजींची ! आमच्या घरात ‘काळ्या’ विद्येचे प्रकार घडत होते. ते सर्व प्रकार बंद करून योगतज्ञ दादाजींनी आम्हाला वाचवले होते. त्या घटनेपासून आम्ही सर्व कुटुंबीय दादाजींचे साधक आहोत.
सकाळी उठल्यावर मी दादाजींकडे गेलो; पण ते तिरुपतीला गेले होते. तिथल्या वहीत मी काकांकडे असलेले काम आणि काकांच्या उपासनेची माहिती लिहिली. दादाजी तिरुपतीहून आल्यावर मी वहीत लिहिलेले काकांचे काम आणि त्यांच्या उपासनेबद्दलची माहिती वाचून मला संध्याकाळी येण्याबद्दल निरोप दिला.
२ आ. प.पू. दादाजींच्या दर्शनाने काकांना धीर येणे : मी दादाजींकडे गेल्यावर काकांच्या कामाविषयी त्यांना कल्पना दिली. काकांनी दादाजींना सर्व दुःस्थिती कथन केली. दादाजींच्या दर्शनाने, त्यांच्या साधनेची खोली पाहून आणि त्यांच्या सान्निध्यात राहिल्यावर काकांना बराचसा धीर आला.
दादाजींनी काकाला सांगितले, ‘‘मी रात्री पहाणी करतो. तुम्ही उद्या सकाळी परत या.’’ दादाजी रात्री दुर्गाडी खाडीवर गेले. शक्तीदेवतांशी संपर्क साधून निरीक्षण केले.
२ इ. दादाजींनी दिलेले संरक्षक कवच आणि सांगितलेले उपाय : निरीक्षणामध्ये साधूबद्दल अशा अर्थाचे निवेदन होते की, ही व्यक्ती एकाच वेळी आध्यात्मिक प्रगती आणि अदृश्य योनीतील शक्ती बाळगून आहे. तिच्याजवळ कर्णपिशाच विद्याही आहे. मोठे आकर्षक व्यक्तीमत्त्व असणारी ही व्यक्ती काकाच्या कुटुंबियांना उद्ध्वस्त करून सर्व संपत्ती (इस्टेट) आणि बंगला गिळंकृत करायला टपली आहे.
दादाजींनी सांगितले, ‘‘प्रथम मी तुम्हाला एक संरक्षककवच देतो. यामुळे तुमचे त्या साधूपासून संरक्षण होईल. तुमचा गेलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्हाला एकसारखी वाटणारी भीती न्यून होईल; पण याचबरोबर फार मोठे वास्तूपूजन करावे लागेल.’’ सर्व गोष्टी मान्य करून आम्ही बाहेर पडलो.
काका-काकू नागपूरला परतले. त्यांच्या समवेत माझा भाऊही गेला होता. काकांनी मुद्दामच आधी बर्याच लोकांना ‘माझ्याकडे स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन आहे. बरीच मंडळी येणार आहेत’, असे सांगून गाजावाजा करून ठेवला होता.
२ ई. प.पू. दादाजी साधकांसह नागपूर येथे येणे आणि वास्तूपूजन झाल्यावर त्रास न्यून होणे : ठरल्या दिवशी दादाजी सांप्रदायी साधकांसह नागपूरला आले. दादाजींना घेऊन आम्ही महाराजांकडे आरतीच्या वेळी गेलो. दादाजी आणि महाराज ५ – १० मिनिटे एकाच खोलीत होते; पण त्या साधूला पत्ताही लागला नाही.
आमच्याकडील २ दिवसांच्या वास्तव्यात एक दिवशी तिसर्या सत्रात आणि दुसर्या दिवशी दुसर्या सत्रात असे मिळून वास्तूपूजन झाले. वेगवेगळ्या समर्थ मंत्रजपाची आवर्तने झाली. संकटहारक मंत्राचा सामुदायिक घोष झाला. रुद्रकवच, बृहस्पतिकवच, शनिकवच, गणपति अथर्वशीर्ष, गायत्री पुरःश्चरण आदी मंत्रजपांनी वास्तू नुसती दुमदुमून गेली. एखाद्या ऋषींच्या आश्रमाप्रमाणे २ दिवस शांत, शिस्तबद्ध, गंभीर वातावरणात जपजाप्य झाला. उदासिनतेची कोळीष्टके, भीतीचे ढग सर्व पार वितळून गेले. काही दिवसांपूर्वीची भयग्रस्त तणावाखाली असणारी ‘हीच का ती वास्तू’, असे वाटायला लागले. हा सर्व मंत्रघोष चालू असतांना अत्यंत मौलिक उच्च संस्कारित पूजा साहित्य, हिमालयीन वनस्पती इत्यादी भूमीला अर्पण केली.
२ उ. दादाजींच्या शांत आणि संयमी बोलण्याने धीर येऊन काकांचे मनोबल वाढणे : दादाजी जायला निघाले आणि सर्वांना दाटून आले. आत्यंतिक कृतज्ञतेचे अश्रू होते ते ! दोनच दिवसांत दादाजींबद्दल खूप आपुलकी, त्यांचा खूप आधार वाटू लागला होता.
दादाजींनी त्यांच्या शांत आणि संयमी; पण तितक्याच निश्चयी स्वरात धीर दिला, ‘‘घाबरू नका. मी जात असलो, तरी माझे इथे पूर्ण लक्ष राहील. शांत रहा, संयम ठेवा. रागाने काही करू नका. एकाने गाय मारली; म्हणून आपण वासरू मारू नये. शक्तीदेवता आपल्याला पूर्ण सहकार्य देतील. तुम्हाला त्याची ४ – ६ दिवसांतच प्रचीती येईल. आपल्या रहात्या जागेतील कपाट प्रथम कह्यात घ्या. त्या मुली कपाटे उघडायला आल्या की, त्यांना सांगा, आमची कपाटे आम्हाला परत हवीत. घाबरू नका. ‘कसे बोलू ?’ म्हणून कचरू नका. शक्तीदेवता तुमच्या मागे उभ्या राहून तुमचे मनोबल वाढवतील.’’ एवढे सांगून दादाजी साधकांसह परतले.
२ ऊ. दादाजींच्या कृपेने शक्तीदेवतांचे साहाय्य मिळणे आणि काकांनी साधूंच्या नन्सना ठणकावून कपाट खाली करण्यास सांगणे : ३ – ४ दिवस झाले असतील, काका देवपूजा करत होते. महाराजांच्या नन्स कपाट उघडायला आल्या. काका मुळातच स्वभावाने गरीब, शांत होते, त्यामुळे आवाज चढवणे त्यांना ठाऊकच नव्हते. सहसा पूजेतून न उठणारे काका उठले आणि त्यांना कुठले बळ आले कुणास ठाऊक ? त्यांनी त्या मुलींना ठणकावून सांगितले. त्यामुळे वरच्या पट्टीतील काकांचे बोलणे ऐकून त्या मुली गारच झाल्या नि ‘महाराजांना विचारून कपाटे खाली करतो’, असे म्हणाल्या. त्यावर ‘मी महाराज वगैरे आम्ही काही जाणत नाही. आताच कपाटे खाली करा आणि मगच खोलीच्या बाहेर जा’, असे काकांनी त्यांना सुनावले. त्यामुळे आदळ-आपट करत त्या मुली कपाटे रिकामी करून गेल्या. काकांचा लगेचच आम्हाला भ्रमणभाष आला. आम्ही ही घटना दादाजींना कळवली. दादाजींनी नुसते स्मित केले. ते म्हणाले, ‘‘यशाबद्दल शक्तीदेवतांनी शिक्कामोर्तब केले.’’ काकांना लगेच आम्ही हा खुलासा कळवला.
दादाजींनी पुन्हा सांगितले, ‘‘घाई करू नका. शक्तीदेवता आपल्याला यश देतील, हे नक्की !’’ दादाजींनी सांगितलेला जप काका-काकू दोघेही करत होते. हा मोठ्या संख्येचा जप होता; पण काका सुटी घेऊन हे सर्व करत होते. अनेकदा हा जप अतिशय कष्टप्रदही होत होता; परंतु त्यात जराही खंड पडू दिला नाही.
२ ए. दादाजींनी सांगितलेले उपाय केल्याने साधूने काकांच्या घरातून गाशा गुंडाळणे : मुलींनी कपाट आम्हाला परत दिले, हे पाहून महाराज खवळले. त्यांनी दादागिरी चालू केली. रात्री-अपरात्री उठून वेगवेगळे मंत्रजप चालू केले. त्यातील ‘शत्रूनाशाय नमः ।’, हे शेवटचे शब्द केवळ ऐकू यायचे.
आम्ही दादाजींना हे कळवले. ते म्हणाले, ‘‘आपण काही त्यांचे शत्रू नाही. आपण त्यांचे हितचिंतकच आहोत. मग घाबरायचे कशाला ? आपण तरी दुसरे काय केले ? ‘त्यांना सद्बुद्धी सुचू दे’, असेच आपले प्रयत्न होते. महाराज जे काही करत आहेत, ती एक प्रकारची त्यांची शरणागतीच आहे.’’
मध्ये काही काळ गेला. महाराज आता पुष्कळ तणावाखाली होते. जाता-येता अंगणातील दिवे बंद करायला सांगायचे. खाली मान घालून जायचे. हळूहळू १ – २ दिवसाआड बंगल्याच्या बाहेर टेंपो दिसू लागला. महाराज सामान हलवू लागले होते. एक दिवस सकाळी उठून बघतो, तर सर्व मुली सामानासहित बंगल्याबाहेर पडत होत्या.
आम्ही ज्या दिवसाची वाट पहात होतो, तो अखेर उजाडला ! महाराजांनी त्यांच्या नन्च्या समवेत ‘मी स्वखुशीने जागा सोडत आहे. माझा या जागेवर कुठल्याही प्रकारे हक्क नाही’, अशा आशयाचे पत्र दिले.
२ ऐ. भोगवादी साधूच्या तावडीतून ऋषीतुल्य प.पू. दादाजींनी सुटका करणे : या महाराजांचा इतिहास असा की, आजपर्यंत त्याच्या विरुद्ध जे जे गेले त्या सर्वांना महाराजांनी यमसदनास पाठवले. आम्ही एकच असे महाराजांविरुद्ध जाऊनही जिवंत राहिलो ! अर्थातच ते केवळ परम पूज्य योगतज्ञ दादाजींमुळे !
आम्हाला २ महाराज भेटले. एक भोगवादी, तर दुसर्याचा शील हाच साधनेचा पाया असलेले. एक सर्व संपत्ती (इस्टेट) गिळंकृत करायला बघत होता, तर दुसर्याने स्वतःच्या साधनेसह आपले सर्व वैभव आमच्यासाठी दोन्ही हातांनी व्यय (खर्च) केले.
एक भगव्या कपड्याआडचा भोंदू, तर दुसरा संसारात राहूनही दर्याखोर्यांतील निर्भीड अरण्यातील ऋषीप्रमाणे विरक्त ! एकाची हयात मायभगिनींना भ्रष्ट करण्यात गेली, तर दुसर्याने अशा अनेक माय-भगिनींना भ्रष्ट होण्यापासून आपल्या योगबलाने वाचवले. एक जण आपल्या विरुद्ध जाणार्यांना सर्रास यमसदनी पाठवत होता, तर दुसर्याला ‘काळ्या’ विद्येच्या प्रयोगापासून मानवी जिवांचे रक्षण करण्यासाठी युरोपास सन्मानाने बोलावून नेले होते.
आम्ही सर्व कुटुंबीय योगतज्ञ दादाजींचे शतशः ऋणी आहोत. ‘आमची श्रद्धा अन् निष्ठा त्यांच्या चरणी सदैव स्थिर राहू दे’, हीच परमेश्वराच्या चरणी आमची मनोमन प्रार्थना.’
(समाप्त)
– श्री. अजित कुलकर्णी, ‘राधेश्याम’ पंडितवाडी समोर, म. गांधी चौक, कल्याण.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !