
नवी देहली – नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करू पहाणार्या एका चिनी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली. झोउ हुआन (वय ४१ वर्षे) असे त्याचे नाव असून तो चीनमधील हुनान प्रांतातील रहिवासी आहे.
Jogbani Border Checkpost: Chinese national caught attempting to infiltrate India via Nepal 🚨
A stark reminder of evolving infiltration tactics; exploiting porous borders and identity similarities to slip through unnoticed.
India must stay alert 🇮🇳
Stronger border… pic.twitter.com/YOctAOLWNu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
हुआन हा नेपाळमधील विराटनगर येथून नेपाळी क्रमांकाच्या दुचाकी गाडीवरून जोगबनी पडताळणी नाक्यावर पोचला. सैनिकांना त्याच्या हालचलींवरून त्याचा संशय आल्याने त्याला अडवण्यात आले. प्राथमिक अन्वेषणात त्याच्याकडे भारतात प्रवेशासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का), पारपत्र किंवा इतर कागदपत्रे आढळली नाहीत. यावरून त्याने अवैधपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. हुआन हा नेपाळमध्ये किती दिवसांपासून होता ? आणि भारतात येण्यामागचा त्याचा उद्देश काय होता ?, यांचे अन्वेषण आता यंत्रणांकडून केले जात आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक