योगी आदित्यनाथ आणि राजकारणातील इस्लाम

देशात  पूर्वी असलेली ब्रिटीश राजवट आणि ब्रिटीश वसाहतवाद याांविषयी बोलले जाते; पण राजकीय इस्लामवर कधीच चर्चा होत नाही. त्याने भारताच्या श्रद्धेला सर्वांत मोठा धक्का दिला आहे. आपले पूर्वज ब्रिटीश वसाहतवादाविरुद्ध लढले; पण आपल्या पूर्वजांनी राजकीय इस्लामविरुद्धही मोठ्या लढाया लढल्या; म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, महाराणा प्रताप आणि महाराणा संघा यांचे स्मरण करतो; म्हणूनच आपण त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून सन्मानित करतो. ही चर्चा आता उत्तरप्रदेशाचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत येते. ‘राजकारणाने इस्लामचा विचार केला पाहिजे’, यावर योगी आदित्यनाथ यांनी दिलेला भर हा एक ऐतिहासिक टप्पा होता. यापूर्वी केवळ योगी श्री अरबिंदो यांनीच ‘राजकारणाने इस्लामचा सामना करावा’, याचा पुरस्कार केला होता. मुसलमानांविषयी पूर्ण सद्भावनेने श्री अरबिंदो म्हणाले होते, ‘मुसलमानसुद्धा भारतमातेची मुले आहेत.’

प्रा. शंकर शरण

१. मुसलमानांना आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व दिले जाणे, हेच सर्व समस्यांचे मूळ !

मुसलमानांच्या मागण्यांपुढे झुकण्याऐवजी जर हिंदु नेत्यांनी केवळ देशाच्या हिताचेच काम केले, तर अनेक मुसलमान नेते आपोआप त्यांच्यासमवेत येतील. ऐक्य करण्याच्या प्रयत्नात मुसलमानांना आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व दिले गेले असून हेच सर्व समस्यांचे मूळ आहे. म्हणून बंधू म्हणून मुसलमान समानतेस पात्र आहेत, त्यापेक्षा कमीही नाही आणि अधिकही नाही. म्हणून हिंदूंनी मुसलमानांना मिठी मारण्यासाठी आणि त्यांच्याशी संघर्ष करण्यासाठी सिद्ध असले पाहिजे. श्री अरबिंदो यांनी वरील सूत्रे विविध ठिकाणी लिहिली आहेत आणि त्याविषयी ते बोललेही आहेत. तथापि गांधीजींच्या काळापासून हिंदु नेतृत्वाने आत्मवंचनेचा (स्वतःला फसवणे) मार्ग स्वीकारला आहे. त्याचे परिणाम केवळ भारतीय जनतेलाच नव्हे, तर पाकिस्तानच्या माध्यमातून जगभरातील अनेक देशांना भोगावे लागले आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथांचे राजकीय इस्लामला केलेले आवाहन हा एक ऐतिहासिक पालट आहे. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले, अन्यथा एक मोठी चूक सुधारता आली असती. तरीही हे सूत्र उपस्थित केल्यासाठी योगी आदित्यनाथ हे धन्यवादास पात्र आहेत.

२. राजकीय इस्लामचे वर्चस्व उणावण्यासाठी…

मोठ्या संख्येने सामान्य मुसलमानांनाही इस्लामी तत्त्वे आणि इतिहास ठाऊक नाही. मौलाना (इस्लामचा अभ्यासक) त्यांना अर्धसत्य सांगून आणि धमक्या देऊन स्वतःच्या नियंत्रणात ठेवतात. जर राजकीय इस्लामविषयी सत्य माहिती सर्वांना दिली गेली, तर इस्लाम नष्ट होईल. राजकीय वर्चस्व उणावतच राहील ! राजकीय इस्लामविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आणि सोपे दोन्ही आहे. भारताचा इतिहास आणि भविष्य या सूत्रांशी खोलवर जोडलेला आहे.

सत्तेत येण्यापूर्वी आणि नंतर उक्ती अन् कृती यांत भेद नसणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ !

योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतंत्र भारतातील पारंपरिक नेत्यांपेक्षा अनेक गोष्टींत वेगळे दिसतात. त्यांच्या २ गोष्टी विशेष उल्लेखनीय आहेत –

अ. पहिले म्हणजे ते त्यांचे बोलणे आणि कृती यांत सुसंगता राखतात. लोकशाही राजकारणात हे दुर्मिळ आहे. अन्य नेते लोकांना भूलवण्यासाठी सर्व प्रकारच्या वक्तृत्वांचा वापर करतो. मग सत्ता हाती आल्यानंतर ते नेहमीच्या व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करतात. तथापि योगी आदित्यनाथ यांनी राज्याची नागरी सुरक्षा, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सत्ता हाती घेण्यापूर्वी आणि नंतर त्यांच्या भाषणात किंवा कृतीत कोणताही भेद आढळून आलेला नाही.

आ. दुसरे म्हणजे ते गैरसोयीच्या सत्यांना सामोरे जातात आणि समाजालाही तसेच करण्यासासाठी प्रेरित करतात. भारतीय नेत्यांमध्ये, विशेषतः हिंदु नेत्यांमध्ये हा एक दुर्मिळ गुण आहे. गेल्या १०० वर्षांपासून याचीच कमतरता दिसून येत आहे. श्री अरबिंदो, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांमध्ये हा गुण होता; पण त्यांच्या नंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली हिंदु नेते बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आणि भित्रे बनले. राजकीय जीवनातील कठोर वास्तवांना सामोरे जाण्याऐवजी त्यांनी ते टाळण्याची, नाकारण्याची, तसेच गोड खोटेपणाने कठीण प्रश्न सोडवण्याची बालिश प्रवृत्ती स्वीकारली. तेव्हापासून हिंदु नेत्यांनी ब्रिटीश राजवट आणि इस्लामी पंथ या दोघांप्रतीही तशीच फसवणूक कायम ठेवली आहे. परिणामी खर्‍या राजकीय मैदानात हिंदु समाजाची वारंवार फसवणूक झाली आहे, स्वतःचीच दिशाभूल करणारी गृहितके आणि खोट्या घोषणा यांनी प्रेरित झाल्यामुळे.

त्यामुळेच अलीकडे योगी आदित्यनाथ यांनी राजकीय इस्लामवर टीका करतांना इस्लामवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता अधोरेखित करणे, हा एक ऐतिहासिक पालट होता. यापूर्वी भारतीय राजकारणात केवळ श्री अरबिंदो यांनीच मुसलमान समाजाप्रती पूर्ण सद्भावनेने राजकीय इस्लामचा सामना करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. श्री अरबिंदो म्हणाले होते, ‘मुसलमानसुद्धा भारतमातेची मुले आहेत; पण वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात काहीच लाभ नाही. हिंदु-मुसलमान ऐक्य एकतर्फी साध्य होऊ शकत नाही. मुसलमानांच्या मागण्यांपुढे नेहमी झुकल्याने समस्या सुटत नाही, तर ती केवळ पुढे ढकलली जाते. हिंदूंना कधीतरी लढावेच लागेल आणि त्यासाठी त्यांनी सिद्ध राहिले पाहिजे.’

– प्रा. शंकर शरण

३. राजकीय इस्लाम भारतासह संपूर्ण जगासाठी गंभीर सूत्र !

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पुनर्बांधणीचे आंदोलन आणि भारताच्या केंद्र सरकारमधील पालटलेले चेहरे हेही राजकीय इस्लामची भूमी आणि त्याविषयी हिंदु नेत्यांची धोरणे यांच्याशी जोडले गेले आहे. हे सूत्र किती महत्त्वाचे आहे, हे यावरून समजू शकते की, समाजवादी पक्षाचे नेते जिया उर्रहमान बर्क वगळता सर्व जण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर गप्प बसले. हे मौन या सूत्राचे गांभीर्यही दर्शवते आणि एका अर्थाने योगी आदित्यनाथ यांच्या आव्हानाला पुष्टी देते.

राजकीय इस्लाम ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक गंभीर गोष्ट आहे, म्हणजेच इस्लामच्या तत्त्वानुसार चालणारे राजकारण. इस्लाम हा आरंभीपासूनच एकसंध, एकात्म आणि शाश्वतपणे निश्चित असून त्याचा एक स्थिर आकृतीबंध आहे. म्हणूनच शतकानुशतके जगभरात त्याचे दावे, कृती आणि परिणाम मूलतः सारखेच राहिले आहेत. केवळ गेल्या १ सहस्र वर्षांच्या इतिहासातच नव्हे, तर आजही भारत हे त्याचे सर्वांत महत्त्वाचे प्रभाव क्षेत्र राहिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याच गोष्टीवर जोर दिला होता.

४. मातृभूमीचे तुकडे करण्याच्या उद्देशाने राजकीय इस्लाम कार्यरत !

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘देशात ब्रिटीश राजवट आणि त्यांची वसाहतवाद यांवर चर्चा होते; पण राजकीय इस्लामवर कोणतीही चर्चा होत नाही. या गोष्टीने भारताच्या श्रद्धेला सर्वांत मोठा धक्का दिला. आपले पूर्वज ब्रिटीश वसाहतवादाविरुद्ध लढले; पण ते राजकीय इस्लामविरुद्धही मोठ्या लढाया लढले. म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, महाराणा प्रताप यांना स्मरतो. त्यामुळेच आपण त्यांना ‘राष्ट्रनायक’ म्हणून सन्मानित करतो; पण हा राजकीय इस्लाम तोच आहे, जो आजही मातृभूमीचे तुकडे करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.’’

खरेतर या भूमीवरील हा राजकीय इस्लाम यापूर्वीही येथे दिसून आला आहे. हेच भारताच्या फाळणीचे मूळ कारण होते. मुस्लीम लीगचे नेते जिना यांनी इस्लामवर स्वतःचा अधिकार सांगितला होता. २२ मार्च १९४० या दिवशी ते म्हणाले होते, ‘हिंदु आणि मुसलमान यांची मूल्ये २ वेगवेगळ्या संस्कृतींची आहेत, ज्यांच्या कल्पना अन् श्रद्धा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ते वेगवेगळ्या स्रोतांकडून प्रेरणा घेतात. त्यांच्या प्रेरणादायी कथा, नायक आणि विषय पूर्णपणे भिन्न आहेत. अनेकदा जे एकासाठी नायक असतात, ते दुसर्‍यासाठी खलनायक असतात. त्याचप्रमाणे त्यांचे विजय आणि पराजय दोघांसाठीही पालटत रहातात.’ केवळ हे पहा की, हा एक ठोस दावा आहे.

५. राजकीय इस्लामच्या उघड दाव्यांकडे कानाडोळा केल्यामुळे भारताची फाळणी

यात कोणतीही तक्रार नाही. उलट सर्व परिस्थितीत वेगळे आणि विरोधी रहाण्याचे हे एक तत्त्व आहे. इतर धर्मांच्या अनुयायांना नाकारून इस्लामी राजकीय वर्चस्वाचा दावा करणे, हे सहअस्तित्वाला नाकारते. असा दावा केवळ त्याच्या डोळ्यांत डोळे घालून आणि एक खुले वैचारिक आव्हान देऊनच सोडवला जाऊ शकतो. याचाच अर्थ राजकीय इस्लामकडे असलेल्या खुल्या वैचारिक दाव्याच्या बरोबरीने समान वैचारिक आणि राजकीय दावा करून लढणे; कारण ही अस्तित्वाची लढाई आहे, ज्यात कोणतीही मधली भूमिका नाही. म्हणून राजकीय इस्लामचे दावे नाकारणे आणि त्याला वैचारिकदृष्ट्या, किंबहुना मानसिकदृष्ट्या पराभूत करणे अनिवार्य आहे. त्याला कोणताही पर्याय न ठेवता पराभूत करा. हे केवळ अचूक ज्ञानानेच साध्य होऊ शकते. नेमक्या याच ज्ञानाच्या अभावी देश गेल्या १०० वर्षांत उद्ध्वस्त झाला आहे. शक्तीच्या अभावामुळे नव्हे, तर समजूतीच्या अभावामुळे ही स्थिती आली आहे. राजकीय इस्लामच्या उघड दाव्यांकडे कानाडोळा केल्यामुळे आणि खोट्या गृहितकांवर आधारित कृती केल्यामुळेसुद्धा ही परिस्थिती ओढवली आहे. राजकीय इस्लामविषयीच्या याच अज्ञानामुळे गांधी आणि काँग्रेसने वर्ष १९१९ मध्ये खिलाफत (खिलाफत नव्हे, तर खलिफा) चळवळीला पाठिंबा दिला. यामुळे इस्लामी फुटीरतावाद आणि वर्चस्वाच्या मानसिकतेला खतपाणी मिळाले. केवळ श्री अरबिंदोच नव्हे, तर ॲनी बेझंटसारख्या नेत्यांनीही याविरोधात चेतावणी दिली होती; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलटपक्षी गांधी आणि काँग्रेस यांनी त्यांच्या दबावाखाली केलेली भयंकर चूक झाकण्यासाठी सतत खोट्या प्रचाराचा आधार घेतला गेला. ब्रिटिशांना दोषी ठरवले. परिणामी हिंदूंची भीती ओळखून राजकीय इस्लाम आणखी शक्तीशाली आणि आक्रमक बनला. अंततः देशाची फाळणीही झाली.

हिंदूंची लोकसंख्या वाढावी; म्हणून अधिक मुले जन्माला घालण्याचे सूत्र मूर्खपणाचे !

खरेतर लोकसंख्याशास्त्रीय पालट थांबवण्याचा एकमेव मार्ग, म्हणजे राजकीय इस्लामचा पराभव करणे. ‘हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत’, हा सल्ला देणे नव्हे, हा एक मूर्खपणाचा सल्ला आहे, जो केवळ राजकीय इस्लामविषयी अनभिज्ञ असलेलेच देऊ शकतात. हिंदूंसाठी ही एक अत्यंत रंजक आणि लज्जास्पद गोष्ट आहे की, एकीकडे राजकीय इस्लामने स्वतःची ठाम भूमिका कायम ठेवली आहे आणि त्यासाठी लढा दिला आहे, तर दुसरीकडे सर्वपक्षीय हिंदु नेत्यांनी सातत्याने नवनवीन बनावट (खोट्या) गोष्टी, खोट्या सूचना, आत्मवंचना आणि बालिश कल्पना मांडल्या आहेत. गांधींपासून आजपर्यंत कोणत्याही हिंदु नेत्याने इस्लामच्या राजकीय दाव्यांना त्यांच्याच भूमिकेतून उत्तर दिलेले नाही.

योगी आदित्यनाथ आणि इतर नेते यांनी पुढाकार घेतला आहे; परंतु सामान्य हिंदु नेते मागे हटत आहेत. त्यांना स्वतःच्या फसवणुकीत आणि सुखसोयींमध्ये अधिक रस आहे. नेमक्या याच कारणांमुळे राजकीय इस्लाम इतर सर्वांवर वरचढ ठरतो. त्याच्या लोकसंख्याशास्त्रीय रचनेमुळे नव्हे, तर त्याच्या मानसिक सामर्थ्यामुळे. जिथे मुसलमान लोकसंख्या १८ टक्के आहे आणि जिथे ती केवळ ५ टक्के आहे, अशा दोन्ही ठिकाणी हे स्पष्ट दिसते. त्यामुळे लोकसंख्येच्या आकडेवारीचे सूत्र बनवणे, ही एकप्रकारची आत्मवंचना आहे.

– प्रा. शंकर शरण

६. लोकसंख्याशास्त्रीय पालट हा राजकीय इस्लामचा परिणाम !

आपल्या सर्व चुका आणि मूर्खपणा लपवण्यासाठी इस्लामी राजकारणावर चर्चा करण्याऐवजी मौन बाळगण्यात आले. भारताच्या फाळणीच्या वेळीही तीच पुनरावृत्ती झाली, जणू काही ती केवळ मालमत्ता आणि सत्तेची विभागणी होती अन् दुसरे काहीही नाही !

जेव्हा इस्लामने लाखो शीख आणि हिंदु यांना ‘धर्मांतर किंवा मृत्यू’ यांपैकी एक निवडायला सांगितले, तेव्हा सत्य लगेचच स्पष्ट झाले. मग गांधी आणि काँग्रेस यांनी पंजाब अन् बंगाल यांच्याशी केलेला विश्वासघात लपवण्यासाठी फाळणीचा संपूर्ण मुद्दाही कायमचा दडपण्यात आला ! गेल्या ७८ वर्षांत संसदेने या विषयावर कधीच चर्चा केली नाही ! परिणामी राजकीय इस्लामविषयीचे अज्ञान टिकून राहिले. पश्चिम पंजाब आणि पूर्व बंगालनंतर काश्मीरमध्येही हिंदूंचा वंशसंहार झाला. उर्वरित बंगाल, आसाम आणि इतर अनेक प्रदेशांमध्येही हीच प्रक्रिया त्याच पद्धतीने चालू आहे, कधी हळूहळू, तर कधी क्षणार्धात.

याला ‘लोकसंख्येचा’ प्रश्न म्हणणे, ही पुन्हा एक चूक आहे. लोकसंख्याशास्त्रीय पालट हा परिणाम आहे, कारण नाही. याचे कारण राजकीय इस्लाम आहे, ज्याची रणनीती आणि डावपेच यांचे एकमेव ध्येय समाजावर आणि अंतिमतः संपूर्ण जगावर इस्लामी राजवट प्रस्थापित करणे, हे आहे. यामुळे लोकसंख्याशास्त्रीय रचना पालटते आणि ती पालटलीच पाहिजे.

नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस्. नायपॉल यांनी राजकीय इस्लामने केलेला विध्वंस दर्शवणे

व्ही.एस्. नायपॉल

भारतात राजकीय इस्लामवर उघडपणे चर्चा करण्याच्या अनिच्छेमुळे त्याला सातत्याने सूट दिली गेली आहे. याच अज्ञानाने गेल्या ७०० वर्षांपासून भारतातील सर्व भीषण घटना लपवून ठेवल्या गेल्या आहेत. यापूर्वी नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस्. नायपॉल यांनी राजकीय इस्लामवर बोट ठेवले होते. त्यांच्या ‘इंडिया – अ वुंडेड सिव्हिलायझेशन’ (वर्ष १९७७) या पुस्तकात नायपॉल यांनी भारतातील ७०० वर्षांच्या इस्लामी राजवटीविषयीच्या मौनावर प्रकाश टाकला. त्यांनी निरीक्षण नोंदवले, ‘भारतीय शिक्षण आणि राजकीय चर्चेत ब्रिटीश वसाहतवादावर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते; परंतु त्यापूर्वी झालेला संपूर्ण इस्लामी विनाश आणि नरसंहार मात्र मौन बाळगतो. हा असा विध्वंस होता, ज्याने १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हिंदु संस्कृतीला जवळजवळ नामशेष केले होते. इस्लामी आक्रमणात हिंदु समाजाचे ‘शीर्ष’, म्हणजेच ब्राह्मण, बौद्ध भिक्खू आणि क्षत्रिय जे नायक होते, ते सर्वांत आधी नष्ट झाले.’

अशा प्रकारे नायपॉल यांच्या मते १८ व्या शतकापर्यंत भारतातील सर्वसाधारण हिंदु समाज हा एक मोडकळीस आलेला आणि शिरहीन देह बनला होता. ब्रिटीश राजवटीच्या स्थापनेनंतर त्याला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली, जेव्हा ब्रिटिशांनी प्रतिभेला प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केला आणि त्यांच्यामधूनच आपल्या प्रजेसाठी, शाळा, नगरपालिका, ग्रंथालये, नागरी संस्था इत्यादींसाठी सैनिक, सहयोगी, कर्मचारी अन् शिक्षक निर्माण केले. नायपॉल यांनी वर्णन न केलेली जखम ही आहे ‘इस्लामी आक्रमणे !’ ही एक अशी जखम आहे, ज्यातून भारत अजूनही सावरलेला नाही.

उलट भारताने ब्रिटिशांनी दिलेली संधी वाया घालवली आणि मग स्वतःच्याच हातांनी इस्लामी सापळ्यात स्वतःला अडकवून घेतले. हे एकप्रकारे स्वतःचेच विडंबन आहे की, हिंदूंनी स्वतःच्या विनाशातून फारच अल्प धडा शिकला आहे, तरीही ते ‘ज्ञाना’च्या परंपरेचा अभिमान बाळगतात !

– प्रा. शंकर शरण

७. हिंदु नेत्यांनी मुसलमानांच्या इस्लामवादाला आव्हान न देणे

लोकसंख्येची पालटती आकडेवारी हा ‘संघटने’चा प्रश्नच नाही. हे सर्वांनाच दिसते की, अनेक पंथांमध्ये विभागलेले असूनही केवळ मुसलमान नेत्यांचाच प्रभाव मोठा आहे आणि त्यांच्यासमोर शेकडो हिंदु नेते आणि ‘जगातील सर्वांत मोठ्या संघटने’मधील सत्ताधारी सतत दुसरीकडे पहात आहेत अन् सबबी सांगत आहेत; कारण अनेक हिंदु नेते मुसलमानांच्या खर्‍या आधाराचा, म्हणजे इस्लामवादाचा आदर करतात अन् त्याला आव्हान देत नाहीत. त्यामुळे ते खरे कारण विसरतात आणि खोट्या कथा रचतात. त्यामुळे ते स्वतःच सिद्ध केलेल्या खोट्या कथानकांमध्ये अडकून खोट्या उपायांचा अवलंब करतात. परिणामी त्यांचा नेहमीच पराभव होतो, तेही हळूहळू आणि अचानक. हा अलीकडचा उघड इतिहास आहे.

८. डॉ. आंबेडकर यांनी ‘इस्लामी राजकारण, म्हणजे मौलवींचे राजकारण’, असे सांगणे

असो. इस्लामी नेत्यांनी नायपॉल आणि योगी आदित्यनाथ यांनी मांडलेलेच मुद्दे आपापल्या पद्धतीने मांडले आहेत. त्यांचे वर्तन आणि कृती योजना सारख्याच राहिल्या आहेत; मात्र हिंदु नेते या विषयावर अनभिज्ञ राहिले आहेत. डॉ. भीमराव आंबेडकर हे एकमेव अपवाद होते. त्यांच्या ‘पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया’ (वर्ष १९४०) या पुस्तकात राजकीय इस्लामचे संक्षिप्त; पण स्पष्ट विश्लेषण आढळते. आंबेडकरांच्या शब्दांत ‘इस्लामी राजकारण हे मूलतः मौलवींचे राजकारण आहे आणि ते केवळ एकच भेद ओळखते तो, म्हणजे हिंदू आणि मुसलमान मूल्यांमधील भेद. मुसलमान समाजाच्या राजकारणात जीवनातील कोणत्याही धर्मनिरपेक्ष घटकाला स्थान नाही आणि ते मुसलमान राजकीय समुदायाच्या केवळ एकाच मार्गदर्शक तत्त्वापुढे नतमस्तक होतात, ज्याला धर्म म्हटले जाते.’ हा धर्म म्हणजे इस्लाम !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– प्रा. शंकर शरण, वरिष्ठ स्तंभलेखक, देहली. (एप्रिल २०२६)

(साभार : मासिक ‘दिग्दर्शक’)