‘अष्टमंगल प्रश्नम्’ मधून मिळालेले उत्तर !
केरळमधील शबरीमला मंदिरात वैदिक विद्वान पद्मनाभ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘अष्टमंगल प्रश्नम्’मध्ये मिळालेल्या उत्तरानुसार मुख्य देव अय्यप्पा याच्याशी संबंधी ‘वावर’ अशी कोणतीही देवता नाही, असे शर्मा यांनी सांगितले. ‘अष्टमंगल प्रश्नम्’ला ‘देव प्रश्नम्’, असे म्हटले जाते.

अय्यप्पा देवाचा सहयोगी देवतेचे नाव ‘वपुरा स्वामी’ !
अष्टमंगल प्रश्नम् ही ज्योतिषशास्त्राची प्रगत आवृत्ती असून त्यातील उत्तरे मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वेद यांच्याविषयी सखोल ज्ञान आवश्यक आहे. ‘केरळ विश्व हिंदु परिषदे’चे अध्यक्ष व्ही.जी. थांपी म्हणाले, ‘‘अष्टमंगल प्रश्नम्मधून मिळालेल्या उत्तरातून अय्यप्पा देवाशी संबंधित ‘वावर’, असे कुणी नव्हते. वैदिक पार्श्वभूमी नसलेले ते एक कृत्रिमरित्या सिद्ध केलेले एक पात्र आहे. अष्टमंगल प्रश्नम्मधून संदेश मिळाला आहे की, अय्यप्पा देवाचा सहयोगी असलेल्या देवतेचे नाव ‘वपुरा स्वामी’ असून काही लोकांच्या व्यक्तीगत स्वार्थापोटी हे नाव ‘वावर स्वामी’ करण्यात आले. या पवित्र मंदिरात येणारे भाविक मुख्य मंदिराच्या गर्भागृहात जाण्याआधी वावर मंदिरात प्रार्थना करतात.
अनेक वैदिक विद्वानांच्या समवेत पद्मनाभ शर्मा यांनी हा दैवी संदेश उलगडून सांगितला आणि ते म्हणाले की, शबरीमला मंदिराच्या परिसरात अय्यप्पा स्वामी यांचे सहयोगी आणि अधिकारी असलेल्या वपुरा स्वामी यांना मान देण्यासाठी वपुरा स्वामी यांचे स्वतंत्र मंदिर उभारावे’, अशी देवाची इच्छा आहे. शर्मा म्हणाले की, शबरीमला मंदिराच्या जवळ वपुरा स्वामी मुख्य देवता असलेले एक मंदिर होते; परंतु कालांतराने हे मंदिर नष्ट करण्यात आले.
अय्यप्पा यांचा सहयोगी मुसलमान सरदार हा कित्येक दशकांचा चुकीचा समज
या वेळी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे नंतर ‘आचार्य सभे’ने जाहीर केली. पर्यटन विभागाने केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्या हस्ते ‘अष्टमंगल प्रश्नम्’चे उद्घाटन करण्यात आले. या उत्तरांमध्ये देव ‘अय्यप्पा यांचा जवळचा सहयोगी एक मुसलमान सरदार आहे’, असा कित्येक दशके असलेला समज चुकीचा आहे’, असे सांगण्यात आले.
– श्री. कुमार चेल्लप्पन
श्री अय्यप्पा देवाचे मंदिर जाळण्याविषयीचा चौकशी आयोगाचा निष्कर्ष गुपितच !

श्री अय्यप्पा देवाचे मंदिरही मे १९५० मध्ये जंगलातील तस्कर आणि हत्तीची शिकार करणारे यांनी लावलेल्या आगीत नष्ट झाले होते. त्यानंतर हे अगदी प्रारंभापासून पुन्हा बांधण्यात आले. प्रख्यात इतिहासकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी असलेले प्राध्यापक पूजाप्पुरा कृष्णन नायर म्हणाले की, याविषयी चौकशी करण्यासाठी त्या वेळी सरकारने आयोग नेमला होता; परंतु त्यांचा निष्कर्ष हा आजपर्यंत गुपितच राहिला आहे.
‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषदे’चे माजी सदस्य प्राध्यापक सी.आय. आयझॅक म्हणाले, ‘‘पोलीस उपमहासंचालक के. केशव मेनन यांनी केलेले अन्वेषण जाहीर करू’, असे आश्वासन देऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सत्तेवर आला; परंतु निवडणूक जिंकल्यानंतर ते त्यांनी दिलेले वचन विसरले. त्यानंतर या राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारांनीही मंदिराला लागलेल्या आगीविषयीचे अन्वेषण झाकून ठेवले.’’
शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वैदिक ग्रंथांमध्ये वपुरा स्वामी यांच्या मंदिराचा उल्लेख निदर्शनास आणला आणि आधुनिक इतिहासात नोंदवण्यात आलेल्या वावर या नावाची कोणतीही व्यक्ती नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वावर या मंदिराला अय्यप्पा देवाच्या भक्तगणांकडून मोठ्या प्रमाणात देगणी मिळते. प्रत्येक वर्षी मंदिरात गर्दी करणारे भाविकांकडून मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी द्वारपालाची पूजा करण्याची प्रथा निर्माण झाली आहे.
– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, कोची, केरळ.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !