‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. जम्मू-काश्मीर ही ऋषिमुनी आणि योद्धे यांची भूमी
‘काश्मीरमध्ये ‘रामराधन’ नावाचे एक ठिकाण आहे. तेथे भगवान परशुरामांनी साधना केली होती. तेथून त्यांनी काश्मिरी हिंदूंना गोमंतकात वसवले. हा १० सहस्र वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असावा, जो महर्षि व्यासांनी सर्वप्रथम लिहिला. ऋग्वेदातही त्याचे वर्णन आहे. काश्मीरमधील वितस्ता नदीचे वर्णन आहे. त्यात म्हटले आहे, ‘भारतात जितकी तीर्थक्षेत्रे आहेत, ती सगळी मिळून जितकी होतील, तितकी काश्मीरमध्ये आहेत आणि जितकी तीर्थक्षेत्रे काश्मीरमध्ये आहेत, तितकीच वितस्तामध्ये एकत्रित आहेत.’ काश्मीरमध्ये महामेश्वाचार्य, अभिनव गुप्त यांसारखे अनेक महर्षि होऊन गेले. केवळ महर्षीच नाहीत, तर योद्ध्यांनीही काश्मीरमध्ये जन्म घेतला आहे.
श्री. विठ्ठल चौधरी यांचा परिचय

देहली येथील श्री. विठ्ठल चौधरी हे ‘युथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष आहेत. ते एक व्यासायिक असून एका माहिती-तंत्रज्ञानविषयक आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते स्वत: काश्मिरी हिंदु आहेत. त्यांनी स्वत: स्वत:च्या जन्मभूमीपासून दूर राहून जीवनाचा कटू अनुभव घेतला आहे.
२. काश्मीरमध्ये हिंदु राजांकडून इस्लामी आक्रमणकर्त्यांचा पराभव
काश्मीरवर धर्मांध आक्रमणकर्त्यांचे आक्रमण झाले, तेव्हा वर्ष ७१२ मध्ये महाराजा ललितादित्य मुक्तपीर यांनी त्यांचा सर्वप्रथम पराभव केला. महंमद गझनी भारतात आक्रमण करण्यासाठी आला, तेव्हा तो प्रथम काश्मीरचे महाराज संग्राम यांच्या राज्यात आला. महंमद गझनी याने भारतावर १७ वेळा आक्रमण केले. त्यात त्याचा परत परत पराभव झाला. तो सर्वप्रथम काश्मीरमध्येच पराभूत झाला होता; परंतु दुर्दैवाने अशा पराक्रमी भूमीवर आज एकही काश्मिरी हिंदु नाही. जेव्हा जेव्हा इस्लामने भारतावर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी प्रथम भारतीय संस्कृतीवर आक्रमण केले. ते आपल्यासमोर अप्रत्यक्षपणे सुफी आणि फकीर यांच्या रूपात आले. जम्मू-काश्मीरच्या राजाने त्यांना येथे आश्रय दिला आणि त्यांनी त्यांचा इस्लाम येथे पसरवला. ज्या वेळी मुसलमानांनी काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीची हानी केली आणि मंदिरे नष्ट केली, असे पंडित जौनराज यांनी त्यांच्या ‘राज्यतरंगनी’ ग्रंथामध्ये १५ व्या शतकात लिहिले आहे.
३. दल सरोवर येथील ‘बटमजार’मध्ये प्रतिदिन १० सहस्र हिंदूंचा नरसंहार
दल सरोवर (डल लेक) पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण समजले जाते. दल सरोवरचे आधीचे नाव ‘सुरेश्वरी’ असे होते. या दल सरोवराच्या ठिकाणी ‘बटमजार’ (जेथे काश्मिरी हिंदूंना मारले जाते) नावाची जागा आहे. त्या ठिकाणी एका दिवसात १० सहस्रांहून अधिक काश्मिरी पंडितांना ठार मारले जात होते. आतापर्यंत तेथून काश्मिरी हिंदूंना ७ वेळेला पलायन करावे लागले. वर्ष १३७९, १५०६, १५८५ आणि त्यानंतर गेल्या १०० वर्षांत त्यांना येथून ३ वेळा विस्थापित व्हावे लागले. वर्ष १९८६ मध्ये झालेल्या विस्थापनातील मी स्वत: एक पीडित आहे.
सतत ७०० वर्षे नरसंहार होऊनही वर्ष १९४१ च्या जनगणनेनुसार काश्मीरमधील हिंदूंची लोकसंख्या १४.१ टक्के इतकी होती; पण आज ती केवळ ०.००१ टक्के इतकीच राहिली आहे. अन्य १४ टक्के लोकसंख्येचे काय झाले ? हा प्रश्न आहे. काश्मीरमधून हिंदूंचे निष्कासन हा भारतात इस्लाम धर्म स्थापन करण्याचा एक प्रयोग होता आणि दुर्दैवाने त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. १०० टक्के इस्लामीकरण झालेले काश्मीर हे भारताचे पहिले राज्य बनले आहे.
४. मुफ्ती महंमद सईद यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये शेकडो मंदिरांचा नाश
‘काही सत्य इतके सत्य असतात की, ते आपल्याला खोटे वाटू लागतात (सम ट्रुथ आर सो ट्रु दे अपिअर टू बी लाय)’, असे आफ्रिकेत एक सुवचन आहे. काश्मीरच्या नरसंहाराचीही हीच स्थिती आहे. याची थोडीफार कल्पना ‘द काश्मीर फाइल’ हा चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते. वर्ष १९८६ मध्ये मुफ्ती महंमद सईद यांनी हिंदूंची शेकडो मंदिरे तोडली. त्यानंतर त्यांना वर्ष १९९० मध्ये भारताचे गृहमंत्रीपद दिले गेले. त्यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर काश्मीरच्या अनंतनाग येथील ३०० हून अधिक मंदिरे जाळण्यात आली. त्यानंतर रूबिया सय्यदला अपहरणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी फुटीरतावाद्यांना सोडले. त्यानंतर फुटीरतावाद वाढत गेला. त्यासाठीच अपहरणाचे खोटे नाटक करण्यात आले. भारताची राज्यव्यवस्था आजही काश्मीरचा नरसंहार मान्य करत नाही; कारण देशात असा कोणताही कायदा नाही, ज्याच्या आधारे या नरसंहाराविषयी खटला प्रविष्ट करता येईल.’
– श्री. विठ्ठल चौधरी, अध्यक्ष, ‘युथ फॉर पनून काश्मीर’, देहली.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !