घाटकोपर येथे लहान हिंदु बालिकांना घरात नेऊन मौलवीकडून लैंगिक अत्याचार !
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

मुंबई – घाटकोपर (पश्चिम) येथे शेजारील ५ आणि ६ वर्षे वयाच्या २ हिंदु बालिकांना घरात नेऊन मौलवी फिरोज इक्बाल शेख (वय ३५ वर्षे) याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या पाशवी कृत्यामुळे संतप्त हिंदूंनी मौलवी फिरोज शेख याला चोप दिला. मोठ्या संख्येने जमलेल्या हिंदूंना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलीस मौलवी फिरोज शेख याला घेऊन जात असतांना जमावाने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि जमाव यांच्यामध्येही वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी पीडित मुलींचे पालक आणि नातेवाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांनाही अटक केली.
२५ एप्रिलला रात्री ८ वाजता घराबाहेर खेळणार्या लहानग्या हिंदु बालिकांचे पालक स्वत:च्या घरी असल्याचे खोटे सांगून मौलवीने त्या दोघींना स्वत:च्या घरात नेले. त्यांचे कपडे काढून त्यांचे लैंगिक शोषण करत असतांना त्यांतील एक मुलगी घाबरून पळून गेली. तिने घडलेला प्रकार स्वत:च्या आईला सांगितला. त्या वेळी पीडित मुलीची आई त्वरित मौलवीच्या घरामध्ये गेली, तेव्हा तो दुसर्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. महिलेने मुलींना मौलवीच्या घरातून बाहेर आणून घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
नराधम मौलवीला कह्यात घेण्याचा हिंदूंचा प्रयत्न !
या प्रकारानंतर मौलवी फिरोज याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने संतप्त हिंदू जमा झाले. या वेळी पोलिसांनी मौलवी फिरोज शेख याला घराबाहेर काढून त्याला पोलीस संरक्षणात नेत असतांना संतप्त जमावाने त्याला सुपुर्द करण्याची मागणी केली. या वेळी पोलीस आणि संतप्त जमाव यांच्यात वाद झाला.
पालकांच्या अटकेच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन !
संतप्त हिंदूंना पांगवण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांना अटक केल्यामुळे जमाव आणखीन संतप्त झाला. पालकांच्या अटकेच्या निषेधात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्री मोठ्या संख्येने हिंदू जमा झाले. या वेळी माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्री २ वाजता धरणे आंदोलन करत त्यांच्या सुटकेची मागणी केली. या वेळी भाजपचे आमदार पराग शहा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !