Assam Rehab Center Conversion : व्यसनमुक्ती केंद्रात हिंदूंचा इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी अमानुष छळ !

  • मुख्य आरोपी जहीरुल शेख पसार, ६ जणांना अटक

  • ९ पीडित हिंदूंची सुटका

  • आमनुष मारहाण, तसेच गोमांस खाण्यासाठी आणला जात होता दबाव

पीडित हिंदू

धुबरी (आसाम) – आसामच्या धुबरी जिल्ह्यातील गौरीपूर येथे एका अवैध व्यसनमुक्ती केंद्रात (‘रिहॅब सेंटर’मध्ये) हिंदूंना इस्लाम स्वीकारण्यासाठी छळल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. २४ एप्रिलच्या रात्री उशिरा पोलिसांनी या केंद्रावर धाड घालून ६ जणांना अटक केली, तर ९ पीडित हिंदूंची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जहीरुल शेख सध्या पसार आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार व्यसनमुक्ती केंद्रातील छळाला कंटाळून ५ पीडित हिंदूंनी इमारतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याच रात्री या केंद्रावर धाड घालून आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केली असता केंद्राच्या आत चालू असलेल्या भयानक कृत्यांचा खुलासा झाला.

असा केला जात होता भयानक छळ !

१. केंद्रात दाखल झालेल्या हिंदूंना ‘चांगल्या उपचारांचे’ आमीष दाखवून इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात होते.

२. पीडितांवर गोमांस खाण्यासाठी दबाव आणला जात होता. नकार दिल्यास लोखंडी सळ्यांनी अमानुष मारहाण केली जात होती.

३. पीडित हिंदूंनी शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार केली आहे.

४. त्यांना शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडले जात होते. तसेच केंद्रातील कर्मचारी आणि मालक यांचे कपडे धुण्यासाठी बळजोरी केली जात होती.

५. केंद्राकडून प्रतिमहा १२ सहस्र रुपये घेतले जात होते; मात्र त्यांच्या देखभालीवर केवळ २ सहस्र  रुपयांच्या आसपास खर्च केला जायचा. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदु समाज घाबरट असल्यामुळेच तो बहुसंख्यांक असूनही त्यांच्यावर अल्पसंख्यांक समाज अशा प्रकारे अत्याचार करतो. ही स्थिती भारतातील १०० कोटी हिंदूंसाठी लज्जास्पद !
  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांना फाशीचे आणि मृतदेहांना अग्नी देण्याचे  (इस्लाममध्ये निषिद्ध पद्धत) शिक्षेचे प्रावधान असणारा राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदाच अशा घटनांवर एकमेव उत्तर आहे, हे लक्षात घ्या !