‘पू. (श्रीमती) अनिता बरारा (सनातनच्या १३८ व्या संत, वय ७३ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्या संतपदी विराजमान झाल्यावर साधकांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे दिले आहे.

१. सौ. सारिका पांपटवार, नांदेड
अ. ‘पू. बराराभाभी शांत, नम्र, आनंदी आणि प्रेमळ आहेत. ‘त्यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळणे’, हे आमचे भाग्यच आहे.
आ. पू. भाभी स्थिर असतात. त्यांच्या चेहर्यावर कधीच कोणता ताण दिसत नाही. गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी पुष्कळ पाऊस पडत होता. तेव्हाही पू. भाभी स्थिर होत्या. सगळीकडे चिखल झालेला असतांना त्या हळुवार चालत होत्या. तेव्हा त्यांच्याकडे पाहून आनंद होत होता. त्या वेळी ‘गुरुदेवांनी त्यांचा सूक्ष्मातून हात धरला आहे’, असे वाटत होते. गुरुदेवांनी पू. बराराभाभींना संतपदी विराजमान करून नांदेडच्या साधकांना प्रसाद दिला आहे.
इ. पू. भाभींचा प्रेमभाव इतका उच्च कोटीचा आहे की, ‘साक्षात् गुरुदेव, म्हणजेच ईश्वर आपल्यासमोर आहे’, असे मला वाटते.
ई. ‘पू. बराराभाभी संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे घोषित झाल्यावर आम्हाला झालेल्या आनंदाचे वर्णन शब्दांत व्यक्त करता येत नाही. पू. भाभींच्या रूपाने आम्हाला साक्षात् गुरुमाऊलींचे दर्शन होत आहे. ‘पू. बराराभाभी संत झाल्या आहेत’, असे घोषित झाल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होत होती. मी सतत भावावस्थेत होते.
उ. पू. भाभींच्या संदर्भात लिहीत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत आहेत.’
२. सौ. शांती दादवानी, नांदेड
२ अ. साधनेविषयी सतर्कता : ‘पू. भाभी नेहमी सांगतात, ‘‘आपली साधना व्यय होणार नाही’, याविषयी सतर्क राहूया. साधना ही ‘सापशिडीच्या खेळा’प्रमाणे असते. आपण कोणाविषयी वाईट विचार केल्यास आपल्या साधनेची हानी होते.’’
२ आ. सेवेची तळमळ : पू. भाभींना उन्हाचा त्रास होत असूनही त्या सेवेला येतात. त्यांना शारीरिक त्रास होत असल्यास त्या सहन करतात. त्या त्यांच्या त्रासाविषयी कोणाला सांगत नाहीत. पू. भाभींकडे चारचाकी वाहन आहे; पण सेवेला जातांना काही ठिकाणी पायी चालावे लागले किंवा रिक्शाने जायचे असेल, तर त्यांची सिद्धता असते. त्यांना कोणतीही सेवा दिली, तरीही त्या ती सेवा करतात.
२ इ. त्या कोणत्याही साधकांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.
२ ई. पू. भाभी नेहमी भावस्थितीत असतात.’
३. सौ. तेजस्विनी पांडे, नांदेड
३ अ. ‘पू. भाभी नियमित व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात.
३ आ. इतरांचा विचार करणे : ‘आपल्यामुळे इतर साधकांना काही अडचण येत नाही ना ?’, याची पू. भाभी निश्चिती करून घेतात. सत्संग किंवा शिबिर असल्यास त्या साधकांसाठी खाऊ आणतात. साधकांची विचारपूस करणे, साधकांना साधनेचे प्रयत्न करायला प्रोत्साहन देणे, अशा अनेक गोष्टी पू. भाभी सहजतेने करतात.
३ इ. ‘पू. बराराभाभी संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे घोषित होत असतांना आलेल्या अनुभूती
१. २५.२.२०२६ या दिवशी पू. भाभी बोलत असतांना मला वेगळाच आनंद जाणवत होता. तेव्हा मला वातावरणात हलकेपणा जाणवला. ‘त्यांचे बोलणे सहजतेने अंतर्मनात
२. सद्गुरु नंदकुमार जाधव आणि पू. बराराभाभी बोलत असतांना मला काही क्षण मी आश्रमात असल्याप्रमाणे वाटले. तेव्हा ‘पिवळ्या रंगाच्या चैतन्यलहरी सर्व साधकांकडे येत आहेत’, असे मला जाणवले. मला या अनुभूती येण्यामागचा कार्यकारणभाव पू. अनिता बरारा संतपदी विराजमान झाल्याचे घोषित झाल्यावर लक्षात आला. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) संदेश ऐकत असतांना माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.’
४. श्री. उत्तमराव मॅनमवार (वय ६५ वर्षे), नांदेड
अ. पू. भाभी कधीच कुणालाही दुखवत नाहीत.
आ. माझ्या मनात ‘पू. बराराभाभी संत आहेत’, असा भाव असतो. कोणी मला विचारल्यावर ‘भाभी संतच आहेत’, असे मी सांगत होतो. ‘केवळ त्यांचे संतपद घोषित होणे शेष आहे’, असे मला नेहमी वाटत होते.’
५. श्री. प्रकाश पांडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७६ वर्षे), नांदेड
अ. ‘माझे पू. भाभी यांच्या घरी सेवेनिमित्त जाणे होते. तेव्हा ‘त्या कुणाला घरी रागात बोलल्या’, असे मला जाणवले नाही. मला त्यांच्या चेहर्यावर कधी ताण दिसला नाही. त्या नेहमी शांत आणि हसतमुख असतात.
आ. त्यांच्याकडून सेवेत झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यास त्या लगेच क्षमा मागत असत आणि त्याची खंतसुद्धा त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे.
इ. मला पू. भाभींच्या समवेत गुरुपौर्णिमेच्या काळात प्रसारसेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी असे लक्षात आले की, ‘जिज्ञासूंनीसुद्धा साधना करावी’, या हेतूने पू. भाभी जिज्ञासूंना साधनेचे आणि अर्पणाचे महत्त्व सांगत असत. त्यांच्या वाणीत चैतन्य जाणवत होते.
ई. गुरुपौर्णिमेपासूनच पू. भाभींच्या चेहर्यावर तेज जाणवत होते. त्या वेळीच ‘त्यांना संत घोषित करतील’, असे मला वाटत होते.
‘हे गुरुमाऊली, पू. भाभींमध्ये असलेले गुण माझ्यामध्ये येण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून तळमळीने प्रयत्न करून घ्या’, अशी तुमच्या कोमल चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’
६. श्रीमती सविता ओबेराय (वय ६३ वर्षे)
६ अ. साधनेची तळमळ : ‘पू. बराराभाभी लग्नाला किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या, तरीही त्या व्यष्टी साधना परिपूर्ण करतात. त्या व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देतात आणि इतरांचाही आढावा घेतात.
६ आ. भावपूर्ण सेवा करणे : जनसंपर्क सेवा असो, विज्ञापने आणि अर्पण मिळवणे असो किंवा सनातन पंचांग, ग्रंथ आणि वह्या यांचे वितरण असो, पू. बराराभाभी सर्व सेवा भावपूर्ण करतात. त्या समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतांना ‘गुरुदेव समोरच्या व्यक्तीच्या हृदयात आहेत’, असा भाव ठेवून बोलतात.
६ इ. पू. भाभींमध्ये ‘प्रेमभाव, आपुलकी, इतरांना समजून घेणे, नेहमी सेवा करायला तत्पर असणे, इतरांना आधार देणे’, हे गुण आहेत.
६ ई. त्यांची गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) दृढ श्रद्धा आहे.’
७. सौ. अश्विनी रुद्रकंठवार, मानवत
७ अ. ‘पू. भाभींच्या बोलण्यात प्रेमभाव जाणवतो.
७ आ. त्या सतत आनंदी असतात.
७ इ. गुरुंप्रती दृढ श्रद्धा : त्यांचे वय झाले असूनही त्या नियमित गुरुमाऊलीला शरण जाऊन सेवा करतात. पू. भाभींची गुरुंप्रती दृढ श्रद्धा असल्यामुळे त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.३.२०२६)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1034927.html
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !