प्रेमळ आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या नांदेड येथील सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा (वय ७३ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (श्रीमती) अनिता बरारा यांच्याविषयी साधकांना जाणवलेल्या गुणवैशिष्ट्यांचा काही भाग २८.४.२०२६ या दिवशी पाहिला . आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1034513.html

पू. (श्रीमती) अनिता बरारा

८. सौ. उज्ज्वला चिद्रावार, परभणी

८ अ. प्रेमळ : ‘पू. भाभी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. माझे प्रयत्न न्यून झाले असल्यास पू. भाभी मला शांतपणे आणि प्रेमाने ‘प्रयत्न कसे करायचे ?’, हे समजावून सांगतात. पू. भाभी प्रत्येक साधकाशी प्रेमाने आणि आपुलकीने संवाद साधतात.

८ आ. साधनेची तळमळ : पू. भाभींकडे एखाद्या सेवेचे दायित्व असेल आणि त्यात चुका झाल्यास त्या लगेच चुका स्वीकारतात अन् त्यात पालट करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. पू. भाभी अंतर्मुख राहून स्वतःचे निरीक्षण करतात. पू. भाभी हिंदी भाषिक आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगात मराठी भाषेतून मार्गदर्शन करत असतांना पू. भाभी भक्तीसत्संगातील अनेक सूत्रे हिंदी भाषेत लिहून घेतात. पू. भाभींमधील साधनेची तीव्र तळमळ अनुभवता येते.

८ इ. साधकांना पू. बराराभाभींचा सहवास हवाहवासा वाटणे : आम्ही सर्व जण ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला गोवा येथे जात असतांना पू. भाभी सर्व साधकांना समजून घेत होत्या. त्यांच्यातील प्रेमभावाने सर्व साधकांना त्यांचा सहवास हवाहवासा वाटत होता.

८ ई. पू. बराराभाभी संतपदी विराजमान होण्यापूर्वीच त्यांच्यात पालट जाणवणे : वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेच्या कालावधीत मला सेवेनिमित्त पू. भाभींचा सहवास लाभला. तेव्हा त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला शांतता आणि स्थिरता यांची अनुभूती येत होती. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत मी पू. भाभींकडे पहात असतांना ‘मी स्वतः अंतर्मुख होऊन माझे मनसुद्धा शांत होत होते’, असे मला जाणवत असे. आम्हाला ‘पू. भाभी संतपदी विराजमान झाल्या आहेत’, ही आनंदवार्ता मिळण्याच्या आधीपासूनच, म्हणजे गुरुपौर्णिमेपासूनच मला त्यांच्यात चांगला पालट जाणवत होता.

८ उ. सतत अनुसंधानात असणे : पू. भाभी सेवा करत असतांना सेवेशी पूर्णपणे एकरूप होतात. त्या इतरांकडे न पहाता त्यांची सेवा अंतर्मुख राहून करत असतात. तेव्हा ‘त्यांचे अंतर्मनातून भगवंताशी अनुसंधान चालू आहे’, असे मला जाणवते.

८ ऊ. ‘पू. भाभी संतपदी विराजमान झाल्या’, ही आनंदवार्ता मिळताच मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती.’

९. सौ. कल्पना गडम, परभणी

९ अ. ‘वर्ष २०१४ मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी प्रथमच पू. भाभींना भेटले. तेव्हा त्यांच्यातील प्रीती मला अनुभवायला मिळाली आणि अजूनही मी त्यांची प्रीती अनुभवतच आहे.

९ आ. स्वतःत पालट करण्याची तीव्र तळमळ : पू. भाभींची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के असतांनाही त्या आढाव्यात ‘मी आणखी काय प्रयत्न करायला हवेत ?’, असे सहसाधकांना विचारत असत.

९ इ. ‘व्यष्टी साधनेत सातत्य आणि चिकाटी कशी असावी !’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पू. बराराभाभी !

९ ई. ‘गुरुदेवांप्रती उच्च कोटीचा भाव आणि श्रद्धा कशी असावी !’, हे पू. बराराभाभींच्या वागण्यातून आणि बोलण्यातून शिकायला मिळते.

९ उ. पू. भाभी प्रत्येक गोष्टीचे श्रेय इतरांना आणि गुरुदेवांना देतात.

९ ऊ. ‘पू. बराराभाभी संत झाल्या आहेत’, असे घोषित होत असतांना आलेल्या अनुभूती : पू. भाभींना केवळ पाहिल्यावर किंवा त्यांच्याशी बोलल्यावर माझे मन सकारात्मक आणि आनंदी होते. सद्गुरु जाधवकाकांनी पू. बराराभाभींना त्यांचा साधना प्रवास सांगण्यासाठी व्यासपिठावर बोलावले. तेव्हा पू. भाभी व्यासपिठावर आल्या. त्या वेळी ‘त्यांच्या देहातून वातावरणात पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे. ‘श्रीमती बराराभाभी संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे गुरुदेव मला सांगत आहेत’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

नंतर काही वेळाने सद्गुरु जाधवकाकांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदेशाचे वाचन केले. तेव्हा ‘गुरुदेवांनी मला आधीच अनुभूती दिली’, त्याबद्दल माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.’

(समाप्त)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक