मौलानाला विदेशातून अवैध देणगी आणि त्याचे पाकशी संबंध असल्याचे उघड
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
संत कबीरनगर (उत्तरप्रदेश) – येथील ‘अल्-हुदा’ हा अवैध मदरसा पाडण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हा मदरसा ब्रिटीश मौलाना शमसुल हुदा खान याच्याशी संबंधित आहे. मौलानांवर अवैध विदेशी देणगी आणि पाकिस्तानशी असलेले संबंध, असे गंभीर आरोप आहेत. कोणत्याही प्रकारचा नकाशा संमत करून न घेता हे बांधकाम करण्यात आले होते.
🚨 Bulldozer Action in Uttar Pradesh
Illegal madrasa linked to Maulana Shamsul Huda demolished in Sant Kabir Nagar after investigation.
SDM probe found the madrasa was built illegally, while reports also revealed suspicious foreign funding and Pakistan links.
Strict action… pic.twitter.com/L9NCnwWX5V
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 26, 2026
१. या संदर्भात संबंधित विभागाने १३ जानेवारी २०२६ या दिवशी नोटीस बजावली होती. असे असूनही बांधकाम वैध ठरवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. तपासणीत हे बांधकाम नियमांच्या विरुद्ध असल्याचे आढळल्याने ते पाडण्याचे आदेश देण्यात आले.
२. ही कारवाई थांबवण्यासाठी मौलाना शमसुल हुदा खान याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई चालू केली.
३. उपजिल्हाधिकारी हृदय राम त्रिपाठी यांनी सांगितले की, मौलानांवर गंभीर आरोप होते, ज्याची चौकशी चालू आहे. मदरसा पूर्णपणे पाडेपर्यंत ही कारवाई चालू राहील.

नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर