
सुरत (गुजरात) – येथील अल्थान परिसरात इयत्ता दहावीत शिकणार्या एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची ३९ वर्षीय महंमद अजीज इलियास याने छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती वार्यासारखी पसरली आणि परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिक मोठ्या संख्येने अल्थान पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. संतप्त जमावाने आरोपीला चोप दिल्याचेही वृत्त आहे.
Surat: Mob thrashes lustful Md Aziz for harassing a minor Hindu girl
In view of the rising incidents of 'Love Jihad' and the inactivity of govt machinery regarding them, this incident shows that Hindus have now become self-aware#Save_Hindu_Girlspic.twitter.com/w6lQd98lRw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारडोली येथील रहिवासी असलेल्या महंमद अजीज इलियास याने रस्त्यावरून जाणार्या एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचा हात धरून तिची छेड काढली. मुलगी घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. या वेळी आसपास उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !