नामांकित ‘टी.सी.एस्.’ आस्थापनात जे काही घडले, तो एका सुनियोजित ‘व्यावसायिक जिहाद’चा भाग असल्याचे आता उघड झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांची विषारी पाळेमुळे भूतकाळातील आपल्या ‘सर्वधर्मसमभाव’ नावाच्या आत्मघातकी धोरणात दडलेली आहेत. असे या किंवा अन्य आस्थापनांमध्ये अन्यत्रही मोठ्या प्रमाणात चालू असण्याची दाट शक्यता आहे. या व्यावसायिक जिहादची बीजे वर्ष २०१५ मध्येच पेरली गेली होती. मुंबईतील जीशान अली खान या २२ वर्षीय एम्.बी.ए. युवकाला ‘हरी कृष्णा एक्सपोर्टस’ या आस्थापनाने नोकरी नाकारल्याच्या एका ‘ईमेल’चा गवगवा करण्यात आला. ‘धर्मावर आधारित भेदभाव’ म्हणून ओरड करण्यात आली होती, तसेच त्या आस्थापनावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर स्वतःची ‘निधर्मी’ प्रतिमा जपण्यासाठी आस्थापनांनी धर्मांधांना नोकर्या देण्याचा जणू धडाकाच लावला; परंतु तेव्हा ही आस्थापने हे विसरली की, धर्मांध जेव्हा कुठल्याही क्षेत्रात शिरतो, तेव्हा तो एकटा येत नाही, तर आपली संपूर्ण ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) तिथे घुसवतो. नाशिकमधील घटना याच ‘इकोसिस्टम’चा परिपाक आहे.
वर्ष २०१५ मध्ये जिशानसाठी गळा काढणारे व्यावसायिक तज्ञ आणि नामांकित आस्थापने आज नाशिकमधील हिंदु भगिनींवर झालेल्या अत्याचारावर मौन का बाळगून आहेत ? जेव्हा हिंदु महिलांचा विनयभंग होतो, त्यांच्यावर बलात्कार होतो आणि त्यांच्या धर्मावर घाला घातला जातो, तेव्हा तुमची ‘कॉर्पोरेट एथिक्स’ (व्यावसायिक मूल्ये) कुठे जातात ? हा दुटप्पीपणा आता उघडा पडला आहे. जर व्यावसायिक क्षेत्र त्याच्या आस्थापनांमध्ये धर्मांधता आणि अत्याचार रोखू शकत नसेल, तर ‘हरी कृष्णा एक्सपोर्टस’सारख्या आस्थापनांनी घेतलेली भूमिका हा ‘भेदभाव’ नसून तो एक ‘संरक्षणात्मक पवित्रा’ होता, असेच म्हणावे लागेल. आपल्या लेकी-बाळींची मानहानी आणि स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी जर काही आस्थापनांनी धर्मांधांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल, असे प्रतिदिन घडणार्या भयंकर घटनांवरून वाटले, तर चूक ते काय ? हिंदूंनी आता या छुप्या आक्रमणांविरुद्ध संघटित होऊन धर्माचे आणि लेकी-बाळींच्या मानहानीचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे, हीच काळाची आवश्यकता आहे. आज फ्रान्स, इस्रायल आणि पोलंड यांसारख्या देशांनी कट्टरतावादाला वेळेत ओळखून मदरशांवर बंदी, हिजाबवर निर्बंध आणि घुसखोरांविरुद्ध कठोर कायदे केले आहेत. त्यांनी ‘कट्टरतावादाला शून्य थारा’ हे धोरण राबवले आहे. भारतानेही आता केवळ निधर्मीपणाच्या मृगजळामागे न धावता या देशांप्रमाणेच कडक कायदे करून या विषारी जिहादी साखळीचा नायनाट करणे अनिवार्य आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे


तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?