
रोहतास (बिहार) – सासाराममधील रामूडीह येथील एका सरकारी शाळेत अत्यंत संवेदनशील प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Beef Found in School Premises: Villagers Erupt in Protest
A highly sensitive incident has surfaced at a government school in Sasaram’s Ramudih area, triggering tension and strong anger among local residents.
Villagers have expressed deep outrage over the matter
Hindus do not… pic.twitter.com/dNPd0N1wPR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी शाळा उघडली असता ४ प्लास्टिक पिशव्यांमध्ये गोमांस आढळून आले. ही बातमी संपूर्ण परिसरात वार्यासारखी पसरली आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळा परिसरात जमा झाले. ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक महंमद अनवर यांच्यासह एकूण ५ मुसलमान शिक्षकांवर गंभीर आरोप केले. संतप्त ग्रामस्थांनी दोषींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळेतील मुसलमान शिक्षक हिंदु मुलांना गोमांस खाऊ घालण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी पुढे सांगितले की, शाळेच्या आसपासचा परिसर हिंदुबहुल आहे आणि शाळेत शिकणारी बहुतांश मुलेही हिंदु समुदायातील आहेत; परंतु काही वर्षांपूर्वी एका कटाच्या अंतर्गत शाळेचे नाव ‘उर्दू मध्य विद्यालय’ असे ठेवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच विक्रमगंजचे उपविभागीय दंडाधिकारी प्रभात कुमार आपल्या पथकासह शाळेत पोचले. उपविभागीय दंडाधिकार्यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी संशयितांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती रोहतासचे पोलीस अधीक्षक रोशन कुमार यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati