ठाणे वाहतूक पोलिसांकडून आर्.एस्.पी. अधिकारी प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

ठाणे, २१ एप्रिल (वार्ता) – ठाणे वाहतूक उपायुक्तालयाच्या वतीने आयोजित आर्.एस्.पी. (‘रोड सेफ्टी पॅट्रोल’- रस्ता सुरक्षा दल) अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा हे केवळ प्रशिक्षण नसून समाजात संस्कारांचा दिवा पेटवण्याची एक मोठी संधी आहे, असा संदेश देत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धानवे यांनी शिक्षकांना प्रेरित केले. ‘एका प्रशिक्षणातून जरी एक अपघात टाळला गेला, तरी एक कुटुंब वाचू शकते’, अशी जाणीव त्यांनी करून दिली. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षित नव्हे, तर उत्तरदायी आणि सजग नागरिक घडवण्याचे दायित्व शिक्षकांवर असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. वाहतूक शाखेच्या वतीने येथील शिक्षकांना वाहतुकीच्या दृष्टीने जागृत करण्यासाठी हे प्रशिक्षण होते. शिक्षकांनी या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना जागृत करणे अपेक्षित आहे.
ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने हे प्रशिक्षण १५ एप्रिल २०२६ या दिवशी तीन हात नाका येथील वाहतूक नियंत्रण कक्षात पार पडले. या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धानवे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी डॉ. मनिलाल शिंपी यांनी रस्ता सुरक्षा आणि नागरी संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर दिलीप स्वामी यांनी अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये ‘ट्रॅफिक सेन्स’ (वाहतूक जाणीव) विकसित करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात विविध अधिकार्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी मैदानी प्रशिक्षणाचीही माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या ठिकाणी प्रसिद्धी प्रमुख तथा दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. किशोर पाटील यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून रस्ता सुरक्षा जनजागृती अधिक प्रभावी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज