
इंद्रप्रस्थ (नवी देहली) – देहलीच्या ऐतिहासिक परिसरात आयोजित ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सव (आय.सी.एफ्. २०२६)’ हा भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा एक अनोखा संगम ठरला. ‘संगम टॉक्स’चे श्री. राहुल दिवाण आणि ‘गरुड प्रकाशन’चे श्री. संक्रांत सानू यांच्या अथक प्रयत्नांमुळे देहली येथे प्रथमच आयोजित झालेल्या या भव्य महोत्सवाने राजधानीतील रहिवाशांना त्यांच्या मुळांशी जोडले जाण्याची संधी मिळाली. या महोत्सवात सनातन संस्थेने आयोजित केलेले ग्रंथप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.
So grateful to be part of the #Indraprastha Cultural Festival! @IPCFestival 🙏🏼
A beautiful reminder of how #Culture shapes our modern identity & at same time we can remain rooted as well 🌸#CulturalHeritage #BookStall@sangamtalks pic.twitter.com/Pwf7Mv6chw
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) April 5, 2026
हिंदु संस्कृतीचा गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी खोट्या कथानकांचे खंडण केले पाहिजे ! – कपिल मिश्रा, मंत्री, देहली
‘इंद्रप्रस्थ’ हे केवळ एक नाव नाही, तर ती पांडवांची राजधानी होती. हिंदु संस्कृतीची ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हा विसरलेला गौरव जनमानसात पुन्हा स्थापित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या खर्या इतिहासाविरुद्ध पसरवल्या जाणार्या खोट्या कथानकांचे खंडण करण्यासाठी समाजाला तथ्य आणि तर्क यांवर आधारित चर्चेची आवश्यकता आहे. नव्या लेखकांनी भारताच्या खर्या इतिहासावर आणि शाश्वत मूल्यांवर अधिक संशोधनात्मक लेख लिहिले पाहिजेत.
क्षणचित्रे
१. महोत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अनेक ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते आणि नामवंत कलाकार यांनी सादरीकरण केले.
२. सनातन संस्थेच्या प्रदर्शनातील अध्यात्म, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्याशी संबंधित ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांनी जिज्ञासूंचे लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनाच्या ठिकाणी देहलीच्या ‘भारत मंडपम्’ येथे १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची एक लघुचित्रफित दाखवण्यात आली.
३. श्री. कपिल मिश्रा यांनी भाषणात सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा विशेष उल्लेख केला.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !