2011 Keralam Bomb Attack : माकपच्या १० कार्यकर्त्यांना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

कन्नूर (केरळम्‌) येथे १५ वर्षांपूर्वी रा.स्व. संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनावर बाँब फेकल्याचे प्रकरण

कन्नूर (केरळम्‌) – येथे १५ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या बाँब आक्रमणाच्या प्रकरणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या १० कार्यकर्त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा दिली असून ती एकत्रितपणे २५ वर्षांपर्यंत जाते.

सरकारी अधिवक्ता यू. रमेशन् यांच्या म्हणण्यानुसार मुख्य आरोपी टी.व्ही. बीनू याला सलग २५ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे; कारण त्यानेच वाहनावर बाँब फेकला होता. इतर आरोपींमध्ये एम्.के. प्रदीपकुमार, पी.पी. सथ्यान, पी.व्ही. बाबूराज (जो सीपीएमचा पंचायत सदस्य आहे), ई.व्ही. विनोद कुमार, विजयन्, के.पी. सुरेश, टोबी, जनार्दनन् के.व्ही. आणि शिवप्रकाश यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व दोषींना २ लाख ६० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

कधी घडली होती घटना ?

ही घटना २७ नोव्हेंबर २०११ वर दिवशी घडली. कन्नूर येथील थिमिरी कॉलेजजवळ रा.स्व. संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन जाणार्‍या एका वाहनावर बाँब फेकण्यात आला होता. संघाची शाखा चालू करण्यावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाला होता आणि एक दिवस आधी झटापटही झाली होती. घटनेच्या वेळी वाहनात ३० कार्यकर्ते प्रवास करत होते, त्यांपैकी ९ जण या आक्रमणात गंभीररित्या घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

  • बाँबस्फोट घडवणारे कार्यकर्ते असणार्‍या माकपवर बंदी घातली पाहिजे ! यासाठी देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर संघटित होऊन दबाव आणला पाहिजे !
  • सनातन संस्थेवर खोट्या आरोपांवरून बंदीची मागणी करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि ढोंगी पुरो(अधो)गामी आता माकपवर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत ?
  • १५ वर्षांनंतर मिळणारा न्याय, हा अन्यायच होय !