विश्वकल्याणासाठी सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करण्यासाठी आणि साधकांना शीघ्र मोक्षप्राप्ती होण्यासाठी अहर्निश कार्यरत असलेली विभूती म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे व्यक्तीमत्त्व हे आदर्श शिष्य, सर्वाेत्तम गुरु, ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, सर्वांगस्पर्शी विपुल ग्रंथसंपदा लिहिणारे थोर लेखक, विविध कलांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती करण्याविषयीचे मार्गदर्शक, अध्यात्मजगतातील संशोधक, धर्मसंस्थापक, प्रभावी हिंदूसंघटक, हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुशोभित आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे चरित्र साधक, शिष्य, संत, लेखक, कलाकार, संशोधक, राष्ट्रभक्त, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा साधनाप्रवास, शिकवण, विविधांगी कार्ये, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ते देत असलेला सूक्ष्मातील लढा आदी अंतर्भूत असणारी ही ग्रंथमालिका म्हणजे चैतन्यमय असा प्रासादिक ठेवाच !

| सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७ |

सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !