
नाशिक – येथील एका टी.सी.एस्. नामांकित आस्थापनात हिंदु तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याच्या भीषण कट रचला गेल्याचेच आता विविध पीडितांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे. या प्रकरणात कारवायांसाठी आरोपींना मोठी आर्थिक रसद पुरवण्यात येत होती, असाही संशय पोलिसांना आहे. यावरून हे केवळ वैयक्तिक कृत्य नसून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत लक्षात आलेले धर्मांतरासाठी बळजोरीचे पुरावे !
आस्थापनातील एका पीडित तरुणाच्या वडिलांना पक्षाघाताचा (पॅरॅलिसिसचा) झटका आल्यावर त्याला धर्मांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्याचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. ‘हिंदु मुलींशी प्रेम करून त्यांना धर्मांतर करायला लावा’, असे सांगितल्याचे एका कर्मचार्याने सांगितले. ‘गरजू आणि २० ते २५ वर्षे वयोगटातील मुलींना धर्मांतराच्या जाळ्यात ओढणे सोपे जात होते’, असेही एका कर्मचार्याने सांगितले. येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्लाघ्य टिपण्या केल्या जायच्या. पीडितांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावर अश्लील टिपण्या, त्यांच्याशी अयोग्य वर्तन आदी केले जाऊन त्यांना गोमांस खाण्याची बळजोरी केली जायची, असेही पुढे आले आहे. तसेच एका पीडितेने रोजे पाळणे, ‘लिपस्टिक’ लावायची सोडणे आदी कृती केल्याचेही यापूर्वी समोर आले आहे. तसेच महिलांना ‘अन्य धर्माचा पोशाख चांगला दिसेल’, असे सांगितले जायचे आदी गोष्टींवरून हा धर्मांतराचा मोठा कट असल्याचे उघड होत आहे.
टी.सी.एस्. आस्थापन प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
संबंधित प्रकरण म्हणजे कटाचा भाग असल्याचे मत !
नाशिक – येथील टी.सी.एस्. आस्थापनातील प्रकरण पुष्कळ गंभीर आहे. याविषयी आम्ही कठोर कारवाई करत आहोत. कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. हे प्रकरण म्हणजे एका कटाचा भाग आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालण्याची आस्थापनाची भूमिका आहे. या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, याचे आम्ही अन्वेषण करू. आम्ही केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली असून आवश्यकतेप्रमाणे त्यांचे साहाय्य घेतले जाईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धर्मांतराची सूत्रधार निदा खान !
आस्थापनाची मनुष्यबळ विभागाची प्रमुख अश्विनी चैनानी हिच्या चौकशीतून निदा खान हीच या धर्मांतर कारस्थानाची मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे आले आहे. सॉफ्टवेअर अभियंता आणि व्यवस्थापक निदा खानने तिच्या पदाचा दुरुपयोग करून आस्थापनात येणार्या हिंदु तरुणींना प्रशिक्षणाच्या बहाण्याने जाळ्यात ओढले. त्यांचे पद्धतशीरपणे बौद्धिक परिवर्तन करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी प्रचंड मानसिक दबाव टाकला, असे आता पीडितांच्या प्रतिक्रियांवरून पुढे येत आहे.
निदा खान हिचा ‘गर्भवती’ असल्याचा दावा !
टी.सी.एस्.मधील धर्मांतराच्या कटाची मुख्य सूत्रधार निदा एजाज खान गेल्या २१ दिवसांपासून पोलिसांना चकवा देत पसार आहे. ती मुंब्रा (ठाणे) असल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांतून येत आहेत. तिने ‘गर्भवती’ असल्याचा दावा केला आहे. अटकपूर्व जामिनासाठी तिने नाशिक रोड न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले आहे. या आवेदनावर १८ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे. तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी