प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकत्र रहाण्यासाठी आणत होता दबाव !

बागलकोटे (कर्नाटक) – नदाफ नावाच्या तरुणाच्या जाचाच्या कंटाळून येथील सेक्टर क्रमांक ४८ मध्ये रहाणारी १९ वर्षीय भूमिका तिप्पण्णावर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ही लव्ह जिहादची घटना असल्याचा आरोप केला आहे.
भूमिका हिचे रिक्षाचालक डोंगरेसाब नदाफ याच्याशी प्रेम असल्याचे सांगितले जात आहे. भूमिकाची आत्या लक्ष्मी यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितले की, नदाफ आमच्या घरासमोर रिक्शा आणून उभी करायचा. यानंतर भूमिकाला भ्रमणभाष करून बोलण्यासाठी सतावत असे. रात्री १२-१ वाजेपर्यंत ते बोलायचे. ‘विवाह करायचा नाही; पण माझ्यासमवेत रहा’, असे म्हणून तो तिचा छळ करत होता. त्याच्या जाचाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली. आम्हाला न्याय हवा आहे.
नदाफ भूमिकाला हिजाब घालून फिरवत असे ! – हिंदुत्वनिष्ठ
हिंदु जागरण वेदिकेचे नेते कुमारस्वामी हिरेमठ म्हणाले की, हे पूर्णपणे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण आहे. नदाफ भूमिकाला इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत होता. रमझानच्या काळात तिला हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठीचे वस्त्र) आणि बुरखा घालून फिरवत होता.
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपत्त्याला अटक
अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे
हिंदूंचे धर्मांतर करणार्या पोलीस उपनिरीक्षकाच्या ख्रिस्ती वडिलांना अटक !
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
मदरशात केले जाते महिलांचे लैंगिक शोषण : विदेशातून निधीही मिळतो !