हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाच्या ख्रिस्ती वडिलांना अटक !

  • बायबलसह इतर धार्मिक पुस्तके जप्त

  • पूर्वी स्वीकारला होता ख्रिस्ती धर्म

बरेली (उत्तरप्रदेश) – हिंदूंना नोकरी आणि पैस यांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मातर करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाच्या वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रेमपाल यादव (वय ५१ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो शीशगड येथील भुडासी गावातील रहिवासी आहे. त्याच्याकडून बायबलसह ख्रिस्ती धर्माची ६ पुस्तके, एक हस्तलिखित वही आणि एक भ्रमणभाष जप्त करण्यात आला आहे. प्रेमपाल यादव याने काही वर्षांपूर्वी स्वतः धर्मांतर केले होते आणि आता तो हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या टोळीशी जोडला गेला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

१. बरेलीच्या सीमेतील सैजना गावात ९ जुलैला धर्मांतराचा हा प्रकार घडला. या प्रकरणी गावातील रहिवासी अंकित याने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनुसार प्रेमपाल याने भुडासी गावातील गजेंद्र नावाच्या व्यक्तीच्या घरी एका प्रार्थनासभेचे आयोजन केले होते.

२. या प्रार्थना सभेत हिंदूंना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. तेथे उपस्थित लोकांना ख्रिस्ती धर्माशी संबंधित प्रचारसाहित्य देण्यात आले, तसेच त्यांना नोकरी आणि पैसे यांचे आमीष दाखवण्यात आले. या सभेत प्रेमपालने हिंदु धर्माविरुद्ध आक्षेपार्ह टिपण्याही केल्या.

३. प्रेमपालविरुद्ध गुन्हा नोंदवून झाल्यानंतर मीरगंज पोलिसांनी प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. पोलिसांना आरोपी प्रेमपाल हा पळून जाण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती १० जुलैला गुप्तहेरांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नगरिया सादात फाटकसमोरील पुलाखाली वेढा घालून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

४. चौकशीच्या वेळी आरोपीने ‘माझ्या कृत्यासाठी मला पश्चात्ताप होत आहे. माझ्याकडून चूक झाली’, असे म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

बाटगे अधिक कडवे असतात, याचे हे उदाहरण ! वडिलांचे कृत्य पोलीस असलेल्या मुलाला ठाऊक नव्हते का ?, याचीही चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !