मदरशात केले जाते महिलांचे लैंगिक शोषण : विदेशातून निधीही मिळतो !

  • मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मदरशामध्ये हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकरण

  • मदरशातील मौलानाच्या घटस्फोटित सुनेचे गंभीर आरोप

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – फुलत गावातील ‘दारुल उलूम रहिमिया’ या मदरशात हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. मदरशाचा संचालक मौलाना हफीजुर्रहमान अंसारी याचा मुलगा जुनैद अंसारी याची घटस्फोटित पत्नी नाझिया हिने पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली आणि मदरशामध्ये कशा प्रकारे हिंदूंचे धर्मांतर केले जात होते ?, याविषयी पोलिसांना माहिती दिली. तेथे महिलांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे, तसेच धर्मांतराच्या कार्याला विदेशातून पैसे पुरवले जात असल्याचे गंभीर आरोप तिने केले.

१. मदरशाचा संचालक मौलाना हफीजुर्रहमान अंसारी आणि त्याचा मुलगा जुनैद अंसारी यांच्याविरुद्ध आधीपासूनच धर्मांतराच्या संदर्भातील तक्रारीवरून रतनपुरी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद आहे.

२. नाझिया हिने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना म्हटले की, मदरशात येणार्‍या महिलांचे लैंगिक शोषण आणि त्यांना ‘ब्लॅकमेल’ करून त्यांचे धर्मांतर केले जात होते.

३. नाझियाचे म्हणणे आहे की, मागील १०-१२ वर्षांपासून ही टोळी सक्रीय आहे. ही टोळी आधी हिंदु तरुण-तरुणींना वेगवेगळ्या कारणांनी आणि आमीष दाखवून मदरशात आणायची. यानंतर छुप्या कॅमेर्‍यांद्वारे त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले जायचे. याच व्हिडिओंच्या आधारे त्यांना धमकावले जायचे आणि धर्मांतरासाठी भाग पाडले जायचे. जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर करण्यास नकार दिला, तर त्याचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली जात असे.

मदरशाच्या संचालकाचे कुटुंब, म्हणजे धर्मांतर करणार्‍यांची टोळी !

नाझियाने म्हटले आहे की, हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या या टोळीमध्ये तिचा पूर्व पती आणि सासरा मौलाना हफीजुर्रहमान अंसारी, दीर जुबैर आणि उबैद, पुतण्या इमरान अन् अंसारी याचा जावई मुजम्मिल यांच्यासह इतर अनेक लोकही सहभागी आहेत. ही टोळी बर्‍याच काळापासून सक्रीय असून अनेक लोकांना त्यांचे लक्ष्य केले आहे.

युनानी औषधांच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री !

या टोळीकडून युनानी आणि आयुर्वेदीय औषधांच्या नावाखाली अमली पदार्थ विकले जात आहेत. औषधांच्या छोट्या बाटल्यांमधून औषधांच्या नावाखाली असे पदार्थ उपलब्ध करून दिले जातात.

स्वामी यशवीर महाराज यांची निष्पक्ष अन्वेषणाची मागणी !

‘योग साधना’ आश्रमाचे महंत स्वामी यशवीरजी महाराज यांनी या मदरशामध्ये धर्मांतर होत असल्याचा आरोप सर्वप्रथम केला होता. त्यांनी व्हिडिओ संदेश प्रसारित करून म्हटले की, फुलत मदरशातील धर्मांतराचा जे सूत्र मी उपस्थित केले होते, आता त्याच कुटुंबाच्या घटस्फोटित सुनेने या प्रकरणी उघडपणे अनेक गंभीर आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली पाहिजे, जेणेकरून सत्य समोर येऊ शकेल.

संपादकीय भूमिका

भारतातील बहुतांश मदरसे हे हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी कारवायांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे अशांना टाळे ठोकणे आवश्यक आहे !