रायपाटण येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हर घर योद्धा शिबिराची’ उत्साहात सांगता !

राजापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – आज युद्ध काळ चालू आहे आणि युद्धकाळामध्ये साधना करणे अत्यावश्यक आहे, यासाठी आपण हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्यानुसार साधना करायला हवी. त्यासाठी आपण नियमितपणे रामरक्षा आणि मारुति स्तोत्र आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप आपण करायचा आहे. आपण जर साधना केली, तर भगवंत आपले रक्षण करील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. वसंत दळवी यांनी केले. ते समितीच्या ‘हर घर योद्धा’ शिबिर सांगताच्या वेळी बोलत होते. हे शिबिर ६ ते १५ एप्रिल या कालावधीत रायपाटण येथील अशोक शेट्ये यांच्या प्रांगणात पार पडले.
श्री. दळवी पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी हिंदूंवरती होणारे अत्याचार पाहिले, त्या वेळेला त्यांनी आई जगदंबेला प्रार्थना केली. ‘‘या संकटातून वाचवण्यासाठी मला असा एक पुत्र दे, जो हे सर्व अत्याचार थांबवू शकेल.’’ जगदंबेच्या कृपेने जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. ज्यायोगे आज आम्ही हिंदु म्हणून जिवंत आहोत, याचे सर्व श्रेय राजमाता जिजाऊंना जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही साधना केली. ते नेहमी जगदंब, जगदंब असे नाम घेत. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपतींचाच आदर्श घेऊन आपणही साधना करणे आवश्यक आहे.
या वेळी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे साधक श्रीकृष्ण नारकर म्हणाले की, राष्ट्र-धर्म द्वेष्ट्ये विविध प्रकारे राष्ट्र-धर्मावर आक्रमणे करतात. त्यांनी वैचारिक स्तरावर आक्रमण केले, तर त्याचा प्रतिवाद आपल्याला वैचारिक स्तरावरच करावा लागतो. त्यासाठी प्रसंगी न्यायालयातही धाव घ्यावी लागते; परंतु काही प्रसंगांत मात्र प्रत्यक्ष आक्रमणाचा प्रतिकार आपल्याला शारीरिक स्तरावरही करावा लागतो. त्यासाठी आपले शरीर केवळ सुदृढ असून उपयोगाचे नाही, तर आक्रमण परतावून लावण्याचे, तसेच स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याचे कौशल्यही आपल्यामध्ये असायला हवे.

अभिप्राय
१. सरपंच नीलेश चांदे – हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. या कार्यात आम्हीही सहभागी होऊ. काही साहाय्य हवे असेल, तर सांगा. हा उपक्रम अन्य ठिकाणीही करूया मी सहकार्य करीन.
२. श्री. विनायक निखार्गे – या शिबिराला आम्हाला प्रारंभी एवढा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते, भगवंताच्या कृपेने प्रतिसाद चांगला मिळाला.
३. श्री. मंगेश पराडकर – स्वतःच्या व्यस्ततेमुळे अपेक्षित वेळ देता येत नाही; मात्र जे काही सहकार्य लागेल ते कधीही करायला तयार आहे.
४. डॉ. परशुराम सुतार – आज युवांनी विशेषतः युवतींनी सक्षम होणे प्रशिक्षित होणे काळाची आवश्यकता आहे. आमच्याकडून जे काही सहकार्य अपेक्षित आहे, तेवढे करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
या शिबिरात नीलम धालवलकर, अस्मी ताम्हणकर, शुभ्रा सुतार, किमया निखार्गे, अनुष्का गुरव, वेदिका चांदे, समाधान ताम्हणकर, तक्ष चव्हाण, आयुष इस्कार, अर्पण हरसोरा आणि कुमार शेट्ये या शिबिरार्थींनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले.
मनोगतांचा सारांश : या शिबिरामध्ये आम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरांवर शिक्षण मिळाले. त्याचसमवेत हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ?, हेही समजले. साधना करणे किती आवश्यक आहे, धर्माचरण आणि धर्मपालन केल्याने होणारे लाभ आम्हाला समजले. त्याप्रमाणे आम्ही कृती करण्याचा प्रयत्न करू. ही सर्व माहिती समितीच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, त्यासाठी आम्ही समितीचे आभारी आहोत.
क्षणचित्रे –१. नीलम धालवलकर यांनी कोणतीही पूर्वकल्पना नसतांना ‘सूत्रसंचालन करण्यास सांगितले’, तेव्हा त्यांनी चांगल्याप्रकारे सूत्रसंचालन केले. २. सौ. वैशाली शेट्ये या ७० वर्षांच्या आजींच्याच घरी शिबिर चालू होते. मुले कसे व्यायाम प्रकार करतात ? हे पाहून त्या स्वतः सराव करायला लागल्या आणि त्यांना त्याचा चांगला लाभ झाला. ‘दुखणारा हात औषधोपचार करूनही बरा होत नव्हता, तो व्यायामाने दुखायचा थांबला’, असे त्यांनी या वेळी सांगितले. |
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !