हिंदूंशी करण्यात येणारा भेदभाव कर्मचार्यांसाठीच्या परिचय दस्ताऐवजातून उघड !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

नवी देहली – माहिती तंत्रज्ञान आस्थापन ‘टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस’मधील हिंदु कर्मचार्यांच्या धर्मांतराचे प्रकार समोर आल्यानंतर आता या ‘कॉर्पाेरेट’ जगतातील हिंदुद्वेषावर चर्चा होऊ लागली आहे. अशातच चष्मे, गॉगल आदी उत्पादने बनवणार्या ‘लेन्सकार्ट’ या प्रसिद्ध आस्थापनाचा हिंदुद्वेष चव्हाट्यावर आला आहे. आस्थापनाच्या कर्मचार्यांसाठीच्या परिचय दस्ताऐवजामध्ये ‘वेशभूषा’ आणि ‘गणवेश’ यांच्या नियमांतून हा हिंदुद्वेष स्पष्टपणे झळकतो. यांतर्गत जर एखादा कर्मचारी कामावर असतांना ‘कलावा’ (हातातील पवित्र दोरा) किंवा कपाळावर कुंकू-टिकली लावत असेल, तर त्याला घरी पाठवले जाईल. थोडक्यात या गोष्टींना कार्यालयात अनुमती नाही. दुसरीकडे याच नियमांमध्ये हिजाब परिधान करण्याला पूर्ण अनुमती देण्यात आली आहे. आस्थापनाच्या या हिंदुद्वेषावरून त्याच्यावर सामाजिक माध्यमांत टीका होत आहे.
Lenskart's employee handbook reveals employees are allowed to wear hijab, but bans kumkum/bindi.
Such discriminatory rules by an Indian company in a Hindu majority Nation is a disgrace.
Hindus should boycott such firms as these have only grown due to Hindus customers.
Because… pic.twitter.com/A1pYjWiWSZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2026
१. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी ‘लेन्सकार्ट’चा निषेध केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, हिंदु बहुसंख्य असलेल्या भारतात कार्यरत असलेले आणि जिथे त्याचे बहुतांश कर्मचारी आणि ग्राहक हे हिंदूच आहेत, अशा ‘लेन्सकार्ट’सारख्या आस्थापनाने अशी भूमिका घेणे निषेधार्ह आहे.
Sorry, does NOT cut it. Who drafted this atrocious document? How did it even pass the first cut in the internal meeting? Who drafts your policy? What is the current policy document? Why are you not making it public? How about a simple, clean, clear apology saying that you are… https://t.co/3ssJ7sSCzf
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) April 16, 2026
मी कधी ‘लेन्सकार्ट’कडून काही खरेदी करणार नाही.
२. अनेक सर्वसामान्य हिंदूंनी लेन्सकार्टवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
एका हिंदूने विचारले, पीयूष बन्सल (लेन्सकार्टचे मालक), हा कसला हास्यास्पद नियम आहे ? टिकली, कलावा किंवा कुंकू यांमुळे कामाच्या ठिकाणचे व्यावसायिक वातावरण कसे विस्कळीत होऊ शकते ? किंवा यांमुळे भेदभाव कसा निर्माण होतो ? अशा प्रकारची बंधने का लादली जात आहेत ?
३. दुसर्या एका हिंदूने लिहिले की, मी लेन्सकार्टकडून चष्मे कधीही खरेदी करणार नाही. आता केवळ हिजाब परिधान करणार्या महिलांनीच त्यांच्याकडून चष्मे खरेदी करावेत. आता कृपया तुमच्या कर्मचार्यांना नमाजपठण कसे करावे ? आणि रमजानच्या काळात उपवास कसे पाळावेत ?, हे शिकवण्याचे कामही करा.
४. ‘ऑपइंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ प्रसारमाध्यमाने दावा केला आहे की, त्यांच्या प्रतिनिधींनी देहलीतील ‘लेन्सकार्ट’च्या काही शाखांना भेट दिली.
कलावा-बिंदी को ना, हिजाब को हाँ; Lenskart के हिंदू विरोधी नियमों का हुआ पर्दाफाश
कर्मचारियों का दावा; कलावा पहनने या तिलक लगाने पर लिया जाता है एक्शन; कमर्चारियों को स्टोर से भेजा जाता है वापस
पहले TCS में ग्रूमिंग गैंग और अब Lenskart के हिंदू विरोधी नियम
आखिर कॉर्पोरेट में चल… pic.twitter.com/figuCbpTvc
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 16, 2026
तेथील कर्मचार्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, आस्थापनाचे नियम हिंदु कर्मचार्यांशी भेदभाव करणारे आहेत.
‘लेन्सकार्ट’च्या मालकाचे हास्यास्पद स्पष्टीकरण !
‘लेन्सकार्ट’चे मालक पीयूष बन्सल यांनी यावर स्पष्टीकरण देतांना म्हटले की,
मी हे थेट सांगू इच्छितो की, आता समोर आलेले आमचे दस्तऐवज आमच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रतिबिंब नाही. आमच्या धोरणात कुंकू आणि टिळा लावण्यासह कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
Hi, all. I’ve been seeing an inaccurate policy document going viral about Lenskart.
I want to speak directly that this document does not reflect our present guidelines.
Our policy has no restrictions on any form of religious expression, including bindi and tilak, and we…
— Peyush Bansal (@peyushbansal) April 15, 2026
आमची कालबाह्य आवृत्ती ‘आज आम्ही कोण आहोत ?, याचे प्रतिनिधित्व करत नाही.’ (यावरही जर विश्वास ठेवायचा झाला, तर ‘लेन्सकार्ट’ भूतकाळात अशा प्रकारे हिंदु कर्मचार्यांशी भेदभाव करायचा, हे स्पष्ट होते. ‘मी आधी एवढ्या चोर्या केल्या आहेत. आता मात्र मी चोर नाही’, असे एखाद्या चोराने स्पष्टीकरण दिले, तरी त्याला पोलीस सोडणार आहेत का ? त्यामुळे आता पोलिसांनी पीयूष बन्सल यांच्यावर धार्मिक भेदभावाला प्रोत्साहन दिल्यावरून भारतीय राज्यघटनेतील कलम १४ ते १६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेची कारवाई का करू नये ? – संपादक)

हिंदूंनो, ‘लेन्सकार्ट’ला वठणीवर आणण्यासाठी हे करा !१. जवळच्या ‘लेन्सकार्ट स्टोअर’ला (शाखेला) भेट देऊन आस्थापनाने कर्मचार्यांशी केलेल्या या धार्मिक भेदभावाचा स्पष्ट शब्दांत वैध मार्गाने निषेध नोंदवा. २. आस्थापनाने हे हिंदुविरोधी नियम मागे घेण्यासाठी तेथील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर वैध मार्गाने दबाव आणा.
३. पुढील ८ दिवसांत हे नियम पालटण्याचे आवाहन करा. ४. ‘लेन्सकार्ट’च्या हिंदु कर्मचार्यांनी कुंकू, टिकली, टिळा लावूनच कामावर जावे. महिनाभर हे ‘वर्क कल्चर’ राबवावे आणि स्वतः धर्माभिमानी हिंदू असल्याचे दाखवून द्यावे’, असे आवाहन हिंदूंनी करावे, अन्यथा आस्थापनावर आर्थिक बहिष्कार घालण्याची चेतावणी द्यावी. |
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !