‘अन्न हेच औषध’ या मोहिमेला प्रोत्साहन
भावी डॉक्टरांना पौष्टीक अन्न बनवण्याचे प्रशिक्षण
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ६० हून अधिक वैद्यकीय संस्थांमध्ये ‘कलीनरी मेडिसिन’ (पाककला औषध) हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. देशातील टफ्ट्स विद्यापिठानेही हा अभ्यासक्रम स्वीकारला आहे. येथे भावी डॉक्टरांना केवळ पुस्तकी पोषणच नाही, तर ‘स्वयंपाकघर साक्षर’ही केले जात आहे. या विद्यापिठात शिक्षण घेणारे भविष्यातील डॉक्टर, दंतवैद्य आणि आहारतज्ञ आहेत. ते विद्यापिठातील स्वयंपाकघरात उत्तम स्वयंपाक बनवायचे प्रशिक्षण घेत आहेत. याची मुख्य संकल्पना ‘फूड इज मेडिसिन’ (अन्न हेच औषध) या मोहिमेला प्रोत्साहन देणे, ही आहे. यामुळे डॉक्टर केवळ आहार पालटण्याचा सल्लाच देणार नाहीत, तर ते रुग्णांना ‘पौष्टीक अन्न कसे बनवायचे ?’, हेही समजावून सांगू शकतील.
१. या मोहिमेच्या अंतर्गत डॉक्टरांकडून ‘मधुमेह, मूत्रपिंड आणि हृदयरोग या विकारांवर कोणती भाजी औषधासारखे काम करू शकते ?’, हेही उदाहरणांसह शिकावणे क्रमप्राप्त असणार आहे.
२. विद्यापिठाच्या ‘कुलिनरी मेडिसिन’च्या संचालिका नादिन तासाबेजी म्हणतात, ‘रुग्णाला प्रथिने खाण्याचा सल्ला देणे पुरेसे नाही. डॉक्टरांना त्या वस्तूची किंमत, शिजवण्यासाठी लागणारा वेळ, तसेच रुग्णाची आवड आणि परंपरा हे सर्व ठाऊक असले पाहिजे.’
३. या उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टर केवळ आजारावर उपचार करणार नाहीत, तर पूर्ण आरोग्याची निर्मिती करतील. या उपक्रमाच्या अंतर्गत अशा वैद्यकीय व्यवस्थेला आरंभ होणार आहे.
४. संशोधनही हेच दर्शवते की ,जर डॉक्टरांना स्वतःला स्वयंपाक कसा करायचा ?, हे ठाऊक असेल, तर ते उपचारात अन्नाचा प्रभावी साधन म्हणून वापर करण्याविषयी अधिक आत्मविश्वास बाळगतात.

‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !