
(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
वॉशिंग्टन (अमेरिका) – ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप लिओ यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एक चित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले होते. त्यामध्ये त्यांनी स्वतःला येशू ख्रिस्तांच्या रूपात दाखवले होते. धार्मिक नेत्यांनी हे चित्र म्हणजे ‘ईशनिंदे’चा प्रकार असल्याचे सांगत त्यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर ट्रम्प यांनी समाजिक माध्यमांवरून ते चित्र हटवले.
ट्रम्प यांनी स्वतःची तुलना येशू ख्रिस्ताशी केल्याचा आरोप फेटाळून लावला. ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘‘हे चित्र प्रसारित केल्यावर मला वाटले की, मी एक ‘डॉक्टर’ आहे आणि मी ‘रेड क्रॉस’शी (युद्ध आणि आपत्ती काळात पीडितांना साहाय्य करणार्या संघटनेशी) संबंधित आहे. मी लोकांना बरे करतो आणि मी ते करत राहीन.
काय होते चित्रात ?
ट्रम्प यांनी प्रसारित केलेले चित्र हे एआय निर्मित होते. या चित्रात ते लाल आणि पांढर्या रंगाच्या झगा घातलेल्या रूपात दिसत होते. त्यात ते एका आजारी व्यक्तीच्या कपाळाला स्पर्श करत असून त्यांचे दोन्ही हात आणि डोके येथून प्रकाश बाहेर पडतांना दाखवण्यात आला होता. त्यांच्या मागे अमेरिकी ध्वज दाखवण्यात आला होता, तसेच काही लोक त्यांच्याकडे आदराने पहातांना दिसत होते.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman