
१. श्री. गिरीष जामोदे, अमरावती

१ अ. सद्गुरु अनुराधा वाडेकरताई यांनी तलवारीचे डावपेच शिकणे : ‘साक्षात् सद्गुरु अनुराधा वाडेकरताई यांनी शस्त्र प्रदर्शनामध्ये हातात ढाल, तलवार आणि चिलखत अंगात चढवून तलवारीचे डावपेच शिकण्याची सिद्धता दर्शवली आणि त्यांनी ते चांगल्या प्रकारे शिकूनसुद्धा घेतले.
१ आ. सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाकांकडून सतर्कता आणि सूक्ष्म निरीक्षण हे गुण शिकायला मिळणे : सद्गुरु पिंगळेकाकांना प्रकारांतील सुधारणा विचारल्यावर त्यांनी ‘आघाताचे प्रसंग दाखवल्यानंतर तातडीने प्रतिकार दाखवण्यात यावा. त्यामुळे ते पहातांना ‘प्रेक्षकांच्या लक्षात येईल आणि त्यातून त्यांना आकलन होऊन समजण्यास सोपे होईल’, असे सुचवले. यातून त्यांची सतर्क वृत्ती आणि ‘प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा कशा करू शकतो ?’, याची तळमळ शिकायला मिळाली.’

२. कु. प्राची शिंत्रे, पुणे
२ अ. वातावरणात पुष्कळ पालट होत असूनही प्रत्येक स्थितीत साधक गुरुदेवांना अनुभवत असणे आणि गुरुदेवच साधकांना घडवत असल्याचे जाणवणे : ‘सराव करतांना वातावरणात कधी पुष्कळ थंडी असायची, तर कधी पुष्कळ ऊन असायचे. पहाटे लवकर उठून, तर कधी रात्री उशिरापर्यंत सर्व जण सराव करत होते. या सर्व प्रक्रियेत सर्व जण गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण करत होते आणि त्यांना अनुभवत होते. नंतर सगळ्या घटनांकडे पहातांना असे जाणवले की, ‘खरंच गुरुदेव साधकांना घडवण्यासाठी किती करत असतात, प्रसंग घडवतात आणि त्यातून आनंदही देतात.’

३. श्री. अमोल पालेकर, ठाणे
३ अ. सर्वांची परिपूर्ण गुरुसेवेची तळमळ असणे : ‘गुरुसेवा चांगली व्हावी’, यासाठी सर्वांची तळमळ होती. देहली येथे सरावाला जागा उपलब्ध नसल्याने अनेक जिल्ह्यांतील मुले शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत पुणे येथे सरावासाठी एकत्रित येत होती. अनेक जण यामध्ये नोकरी करणारे असूनही शुक्रवारी उशिरापर्यंत ते सरावाच्या ठिकाणी यायचे आणि शनिवारी सकाळी लवकर साडेसहाला उठून पूर्ण दिवस सराव करायचे. सगळ्यांना झोप अल्प मिळूनही सगळ्यांचा उत्साह पुष्कळ होता. शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस सराव करून सोमवारी परत सर्व साधक कामावर जायचे. या सगळ्यांमध्ये ‘गुरूंची सेवा परिपूर्ण व्हावी. तिच्यात कुठलीच कमतरता पडू नये’, अशी तळमळ होती.
३ आ. ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार व्हावा’, ही गुरुदेवांची तळमळ असल्यामुळेच साधकांकडून प्रयत्न होणे : दुसर्या दिवशीच्या प्रात्यक्षिकांच्या ‘सेटअप’मध्ये पालट झाला. त्या वेळी गुरुदेवांचा निरोप आला की, ‘मी ‘ऑनलाईन’ महोत्सव बघत आहे.’ गुरुदेवांचे उपक्रमाकडे पुष्कळ लक्ष आहे, या उपक्रमाचा विस्तार व्हावा, अनेक लोक जोडले जावेत, ही त्यांचीच तळमळ आहे’, असे जाणवले.
३ इ. या प्रात्यक्षिकांच्या शेवटी एका प्रसंगात अफझलखान वधाच्या माध्यमातून ‘आतंकवाद कसा संपवावा ?’, हे दाखवण्यात आले होते आणि तेच संपूर्ण सोहळ्याचे ‘सेंटर ऑफ ॲट्रक्शन’ (आकार्षण) ठरले.’
४. श्री. यश मुगड्याल, सोलापूर
४ अ. ‘सर्व जण एक माळेत विणलेल्या मण्यांप्रमाणे एकत्रित होते, यातून गुरूंची कृपा, शिकवण आणि नियोजन कसे असायला पाहिजे ?’, हे शिकायला मिळाले.’

५. श्री. हेमंत पुजारे, मुंबई
५ अ. समूह निर्णय प्रक्रियेमुळे साधकांमध्ये असलेले नेतृत्व गुण उभारून येणे : ‘श्री. महेश लाडदादामध्ये अनेक गुण आहेत. प्रशिक्षणाच्या प्रकारांची परिपूर्णता, विविध प्रसंगांमध्ये भूमिका करत असतांना ‘ती भूमिका कशी सादर करावी ?’, याचे चांगले ज्ञान दादाला आहे. या वेळी दादांनी अनेक सूत्रांमध्ये पुढाकार घेऊन त्यात बदल सांगून नाविन्यपूर्ण सूत्रांमध्येही सहभाग घेतला. त्या दादांचे कौशल्य, नेतृत्व, प्रशिक्षणातील बारकावे असे अनेक गुण लक्षात आले. समूह निर्माण प्रक्रिया असल्यामुळे सर्वांना स्वतःचा विचार मांडण्याची संधी मिळत होती. प्रत्येक जण माझा सहभाग कसा वाढेल आणि गुरुदेवांना अपेक्षित प्रात्यक्षिके कशी होतील ?’, या व्यापक विचारांमुळे ‘शरिराने वेगळे असले, तरी मनाने एकच झाले होते आणि हा लाभ आपण जिल्ह्यांमध्येसुद्धा साधकांच्या समवेत सेवा करत असतांना समूह निर्णय प्रक्रियेने केल्याने जिल्ह्यातील साधकांमध्येही संघभाव वाढू शकतो’, हे लक्षात आले.
६. प्रशिक्षणातील सर्व साधक
६ अ. सेवेत सहभागी होतांना ‘देव सतत वर्तमानकाळात रहाण्याची सिद्धता करवून घेऊन प्रत्येक क्षणी घडवत आहे’, याचीच जाणीव झाली.
६ आ. सतत नियोजनात पालट होऊनही सर्वांची शिकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती वाढली असणे : शंखनाद महोत्सवात शौर्य प्रात्यक्षिक सेवेत आम्ही काही जण सहभागी होतो. या सेवेची सिद्धता जवळपास २ मास अगोदरपासून चालू झाली होती. प्रत्यक्ष सरावासाठी ज्या वेळी सर्व जण एकत्र आले, तेव्हापासून ठरवलेले प्रकार, ठरवलेल्या काही भूमिका यात अनेक पालट होत होते, सेवेत असणार्या सर्वच प्रशिक्षकांकडून शिकायला मिळत होते. सर्व जण जे नियोजन समोर येईल, जे त्या वेळी सांगितले जाईल, ते सर्वकाही स्वीकारून त्याप्रमाणे सिद्धता करत होते.
६ इ. देवच मनोलय करवून घेत असल्याचे जाणवणे : दुसर्या दिवशी म्हणजे १४.१२.२०२५ या दिवशी सादरीकरणाची सर्व सिद्धता झालेली असतांना अचानक कार्यक्रमाच्या नियोजनात काही अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक सादरीकरण रद्द झाल्याचा निरोप आम्हाला आला. सुरुवातीला लगेच स्वीकारले गेले नाही; परंतु अगदी ५ मिनिटांत सर्व जण सकारात्मक झाले आणि सर्वांनी स्थिती स्वीकारली. देवाला आपला मनोलय करायचा आहे. आता या कित्येक दिवसांपासून चालू असलेल्या सरावाच्या माध्यमातून आपण शरीर झिजवले, देव आता आपले मन झिजवत आहे’, असाच सर्वांनी भाव ठेवला.
सर्वांनी स्वीकारल्यावर जवळजवळ १ घंट्याने आम्हाला निरोप आला की, प्रात्यक्षिक दाखवायचे आहे आणि त्यानंतर प्रात्यक्षिक सादरीकरण झाले आणि ते सादरीकरण उत्तमही झाले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक: ९.१.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।