
वॉशिंग्टन (अमेरिका) – मला असा पोप नको, ज्याला इराणकडे अण्वस्त्र असणे योग्य वाटते. मला असा पोप नको, ज्याला अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करणे चुकीचे वाटते, असा देश जो अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पाठवत होता आणि त्याहूनही वाईट म्हणजे, त्याच्या कारागृहातील खुनी अन् अमली पदार्थ माफिया यांना आमच्या देशात सोडून कारागृहे रिकामे करत होता. मला असा पोप नको, जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका करतो; कारण मी नेमके तेच करत आहे, ज्यासाठी माझी प्रचंड बहुमताने निवड झाली आहे. मी गुन्हेगारीचे प्रमाण विक्रमी पातळीवर न्यून केले आहे आणि इतिहासातील सर्वांत मोठी शेअर बाजार तेजी निर्माण केली आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅथॉलिक ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप लिओ चौदावे यांच्यावर कठोर टीका केली. पोप लिओ चौदावे यांनी ट्रम्प आणि अमेरिका यांचे नाव न घेता इराण युद्धावरून त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देत पोप लिओ चौदावे यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांनी पोप यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. तसेच ट्रम्प यांनी एक चित्रही प्रसारित केले आहे. या चित्रात ते येशू ख्रिस्ताच्या रूपात दिसत असून भोवती दैवी प्रकाश दिसत आहे. ते एका व्यक्तीला उपचार करतांना दिसत आहेत.
🔥 Trump vs Vatican: Explosive Clash Over Iran War
“I don’t want a Pope who thinks it’s okay for Iran to have nuclear weapons!”
– Donald TrumpUS President Donald Trump launches a blistering attack on Pope Leo XIV, calling him:
⚡ “Weak on crime”
⚡ “Terrible for foreign policy”… https://t.co/iFdf9nGHuU pic.twitter.com/eHjtullzb2— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2026
ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून पोप लिओ चौदावे यांच्यावर टीका केलेली पोस्ट
१. पोप लिओ हे गुन्हेगारी रोखण्यात दुबळे आणि परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत वाईट आहेत. ते ट्रम्प प्रशासनाच्या ‘भीती’बद्दल बोलतात; पण कोरोना महामारीच्या काळात कॅथॉलिक चर्च आणि इतर ख्रिस्ती संघटना यांच्यामध्ये जी भीती होती, त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. त्या वेळी चर्चमध्ये प्रार्थनासभा घेतल्याबद्दल पाद्री, मंत्री आणि इतर सर्व यांना अटक केली जात होती. अगदी लोक बाहेर असतांना आणि एकमेकांपासून १० ते २० फूट लांब असतांनाही त्यांना अटक करण्यात येत होती. मला त्यांचा भाऊ लुईस, लिओपेक्षा अधिक आवडतो; कारण लुईस पूर्णपणे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान करणे) या विचारांचा आहे. त्याला गोष्टी समजतात; पण लिओला नाही.
२. लिओने कृतज्ञ असायला हवे; कारण सर्वांना ठाऊक आहे की, त्यांची निवड एक धक्कादायक आश्चर्य होते. पोप होण्याच्या कोणत्याही सूचीमध्ये त्यांचे नाव नव्हते. चर्चने त्यांना तिथे केवळ यासाठी बसवले कारण ते अमेरिकी होते आणि त्यांना वाटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी व्यवहार करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असेल. जर मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते. दुर्दैवाने लिओची गुन्हेगारी आणि अण्वस्त्रे यांविषयीची मवाळ भूमिका मला पटणारी नाही.
३. लिओ ओबामा समर्थकांना भेटतात, जे डाव्या विचारसरणीचे अपयशी लोक आहेत आणि ज्यांना चर्चमध्ये जाणार्यांना आणि धर्मगुरूंना अटक व्हावी, असे वाटते.
४. लिओने पोप म्हणून स्वतःची वागणूक सुधारावी, व्यवहारी बुद्धीचा वापर करावा, कट्टर डाव्यांचे लाड करणे थांबवावे आणि राजकारणी न होता एक ‘महान पोप’ होण्यावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे त्यांची स्वतःची पुष्कळ हानी होत आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, कॅथॉलिक चर्चची हानी होत आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman