‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चा ‘ब्राह्मण शेतकरी मेळावा’ उत्साहात पार पडला !

कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न आहेत. संस्कार आणि संस्कृती जतन करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या पौरोहित्य करणार्या समाजबांधवांसाठी शिष्यवृत्ती मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. यापुढील काळात महिलांसाठी ‘रमाबाई रानडे’ यांच्या नावाने २० लाख रुपयांपर्यंत बिनव्याज कर्ज देण्याचा प्रस्ताव असून शेतकरी समाज बांधवांसाठी महामंडळ प्रयत्न करील, अशी ग्वाही ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिली. ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने येथे ‘ब्राह्मण शेतकरी मेळावा’ पार पडला.
Akhil Bharatiya Brahmin Sabha to host Brahmin Farmers’ Meet on April 12 at Kolhapur; 500+ Farmers Expected
Weather expert Punjabrao Dakh and NABARD’s R.S. Chougale to speak.
Key presence: Harish Shinde, Shyamrao Joshi, Govindrao Kulkarni, Ashish Damle, Girish Chitale, Prakash… pic.twitter.com/SumTdXb570
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 12, 2026

या प्रसंगी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, ‘चितळे उद्योगसमुहा’चे संचालक गिरीश चितळे, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामराव जोशी, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विवेक जोशी यासंह समाजबांधव उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. गिरीश चितळे म्हणाले, ‘‘यापुढे शेतीमध्ये आधुनिक व्यवस्थापन आणावे लागेल. रसायनमुक्त शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पादनाचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’’ श्री. गोविंदराव कुलकर्णी म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाजाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे. ब्राह्मणत्वाचे पालन केल्यास त्यांना काहीच अवघड नाही.’’ या मेळाव्यात हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी ‘पालटते हवामान’ या विषयावर मार्गदर्शन केले.
🛕"We will work towards the development of the Katyayani Temple complex, one of the Navadurga shrines,” – Capt. Ashish Damle, Chairman, Parshuram Economic Development Corporation.
He was speaking to Dainik Sanatan Prabhat, after visiting the Katyayani Devi Temple and inspecting… pic.twitter.com/5Ob1zbuLpi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 12, 2026
क्षणचित्रे
१. मेळाव्यापूर्वी गोमातेचे पूजन करून गोग्रास भरवण्यात आला.
२. परशुरामांच्या प्रतिमेचे कयपंजीने दीपप्रज्वलन करण्यात आले.
| या निमित्ताने सातारा येथील सौ. सुनीती धायगुडे, मलकापूर येथील सौ. हेमांगी देशपांडे, ईश्वरपूर येथील सौ. वरदा हसबनीस यांसह १० महिला शेतकर्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, तर गिरीश चितळे यांना ‘सहकारभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. |
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !