उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रिया राजंदेकर ही या पिढीतील एक आहे !
फोंडा (गोवा) येथे रहाणारी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन साधना करते. १३.४.२०२६ (चैत्र कृष्ण एकादशी) या दिवशी कु. श्रिया हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. श्रिया राजंदेकर हिला १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. समजूतदारपणा
‘कु. श्रिया हिला कधीच कोणतीच गोष्ट पुनःपुन्हा सांगावी लागत नाही, तसेच तिचे कधीच कुणाविषयी कसलेच गार्हाणे नसते, उदा. ती रामनाथी आश्रमात सेवेला जाते. प्रतिदिन वेगवेगळ्या प्रकृतीच्या साधकांशी तिचा संपर्क येतो. कोणताही प्रसंग घडला, तरी श्रियाचे नेहमी एकच म्हणणे असते, ‘‘समोरची व्यक्ती तिच्या दृष्टीने योग्य असते. ती तिच्या प्रकृतीप्रमाणे वागणार आहे. मग आपण त्याचा त्रास कशाला करून घ्यायचा ? आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यायला हवे आणि जेवढे जमेल तेवढे तिला समजून घेतले पाहिजे.’’
२. प्रेमळ वागण्याने सर्वांची आवडती झालेली कु. श्रिया !
अ. श्रिया सर्वांशी अतिशय आदराने आणि प्रेमाने वागते. त्यामुळे समाजातील लहान मुले असोत किंवा आश्रमातील बालसाधक, सर्वांशी तिची छान जवळीक होते.
आ. ती घरी येणार्या प्रत्येकाची काळजी घेते. घरी कुणीही पाहुणे आले की, ‘त्यांना पाणी देणे, त्यांची झोपण्याची, औषधे ठेवण्याची जागा नीट करून ठेवणे, ‘त्यांना जेवायला काय आवडते ?’, ‘रात्री झोप नीट झाली ना ?’, हे सगळे ती स्वतः लक्ष देऊन बघते.
इ. ‘श्रिया पुष्कळ प्रेमळ आहे’, असे आमच्याकडे गृहकृत्यांत साहाय्य करणारी मुलगीही म्हणते. ती कामासाठी आल्यावर श्रिया तिला आवश्यकतेनुसार पंखा लावून देते, पाणी देते, तसेच तिची प्रेमाने विचारपूस करते. तिला कामात कुठे साहाय्य लागले, तर श्रिया तेही करते. त्यामुळे तिलासुद्धा श्रिया पुष्कळ आवडते.
३. ‘श्रियाला राग आला आहे आणि ती रागावून बोलली आहे’, असे प्रसंग अत्यल्प वेळा घडतात.
‘नारायणा (टीप), मला श्रियाताईसारखी मोठी ताई दिल्याबद्दल आपल्या चरणी खूप खूप कृतज्ञता ! मला माझी श्रियाताई पुष्कळ आवडते.’![]() – पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर, (१५.३.२०२६) टीप – पू. वामन हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’, असे संबोधतात. |
४. उत्तम नियोजनकौशल्य
‘प्रत्येक कृती नियोजनपूर्वक करणे’, हा तिचा गुण आहे. ती वर्तमानकाळाला धरून नियोजन करते. त्यामुळे तिच्या नियोजनात तिला फारसा पालट करावा लागत नाही. तिला वेळ वाया गेलेला किंवा घालवलेला आवडत नाही. ती तिच्या सर्व सेवा आणि घरातील कामे यांची सूची बनवून त्याप्रमाणे कृती करत असते. श्रियाकडे तिच्या प्रत्येक बारीक-बारीक सेवांची नोंद लिखित स्वरूपात असते. पडताळणीसूची बघूनच ती तिच्या सर्व सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ‘तिच्यासह सेवा करणार्या साधकांचाही वेळ वाया जाऊ नये’, याची ती नेहमी काळजी घेते.

५. इतरांना सहजतेने समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे
हा गुण तिच्यामध्ये लहानपणापासून आहे. ती सेवेच्या ठिकाणी गेल्यावर सेवा म्हणून इतर साधकांना सहजतेने साहाय्य करते.
मागील वर्षभर मी आणि श्रियाचे बाबा (श्री. अनिरुद्ध राजंदेकर) आमच्या नवीन घराच्या बांधकामात पुष्कळ व्यस्त आहोत. त्यामुळे पुष्कळ वेळा आम्हाला त्यासाठी सरकारी कार्यालयात किंवा इतर ठिकाणी जावे लागते. त्या वेळी श्रिया सहजतेने आणि अगदी प्रेमाने घरातील सर्व कामे करते, तसेच पू. वामन (कु. श्रिया हिचा धाकटा भाऊ, सनातनचे दुसरे बालसंत, वय ७ वर्षे) यांना सांभाळते. त्यांना काय हवे-नको ते बघते.
आमच्या व्यस्ततेमुळे तिला काही वेळा आश्रमात सेवेला जायला विलंब होतो किंवा जाता येत नाही. त्याबद्दल एकदा मी तिची क्षमा मागितली. तेव्हा श्रिया मला म्हणाली, ‘‘आई, तू आणि बाबा आपल्या घरासाठीच हे सगळे करत आहात. तुम्ही जे करत आहात, ती तुमची साधनाच आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी भ्रमणभाषवरून करण्याच्या सेवा पूर्ण करीन आणि पू. वामन यांच्या समवेत रहाणे हीसुद्धा सेवाच आहे ना ?’’
६. अनासक्त
एखादी वस्तू, व्यक्ती, प्रसंग किंवा सेवा यांबद्दल तिच्या मनात आसक्ती निर्माण झाल्याचे मी कधीच पाहिले नाही.
७. साधकत्वाचे सतत भान असणे
श्रिया आश्रमात किंवा केवळ साधकांमध्ये असतांनाच नाही, तर इतर वेळी समाज, नातेवाईक आणि ओळखीचे यांच्यामध्येही वावरतांना साधकत्वाचे भान ठेवून वागते, उदा. बाहेर एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर कुणी तिला केस मोकळे ठेवण्यास आणि जीन्स- टीशर्ट, असे पाश्चात्त्य पोशाख घालण्यास सांगितले, तर ती त्यांना नम्रतापूर्वक नकार देते. त्यांना हिंदु धर्माप्रमाणे वेशभूषा सात्त्विक असण्यामागील कारण थोडक्यात सांगते; परंतु त्याच वेळी ती तिच्या सात्त्विक रहाणीमानावर ठाम असते. त्यामुळे अन्य लोक श्रियाला सात्त्विक भेटवस्तू देतात.

८. गुरुदेवांच्या अनुसंधानात असल्याने सतत आनंदी असणे
श्रियाचा स्वभाव मुळातच आनंदी आहे. त्यामुळे ती जिथे असते, तेथील वातावरण आपोआपच आनंदी होऊन जाते. याविषयी एकदा मी श्रियाला विचारले, ‘‘तू आनंदी कशी असतेस ?’’ त्यावर श्रिया मला म्हणाली, ‘‘माझ्या मनात सतत आनंदाच्या लहरी आपोआपच निर्माण होत असतात. मला सतत प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आठवण येत असते किंवा मी मनातून त्यांच्याशी संवाद साधत असते. त्यामुळे असे असेल; कारण प.पू. गुरुदेव हे आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप आहेत ना !’’
त्या वेळी ‘तिचा गुरुदेवांप्रतीचा भाव आणि त्यामुळे निर्माण होणारे चैतन्य’, यांमुळे देवच तिला सतत आनंदात ठेवतो’, असे मला वाटले.
९. गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव
पू. वामन यांची मोठी बहीण म्हणून किंवा तिचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे लिखाण यांमुळे पुष्कळ साधक तिला ओळखतात. विविध राज्यांतून साधक रामनाथी आश्रमात आले की, तिला भेटतात आणि तिचे कौतुक करतात. हे सर्व ती मला घरी आल्यावर सांगते; पण ‘तिला त्याविषयी केवळ कृतज्ञता वाटत असते’, हे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट लक्षात येते.
श्रिया म्हणते, ‘‘मी प.पू. गुरुदेवांची साधिका आहे. मी गुरुसेवा करायला आश्रमात येते आणि आश्रम आणि साधक यांमुळे मला गुरुसेवेची संधी मिळत आहे. इतकीच माझी ओळख आहे. माझ्यामागे असलेले प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व बाजूला केले, तर मी शून्यसुद्धा नाही. त्यामुळे जे आहे, ते गुरुदेवांची शिकवण, कृपा आणि त्यांचे अस्तित्व आहे. बाकी सगळे अशाश्वत आहे.’’
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला श्रियासारखी गोड, निर्मळ मनाची आणि गुर्वाज्ञा प्रमाण मानून साधनारत रहाणारी मुलगी मिळाली’, याबद्दल श्री गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (कु. श्रिया हिची आई), फोंडा, गोवा. (१५.३.२०२६)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !