‘सध्या गेले काही दिवस मला झोप पुष्कळ येत आहे. त्यामुळे माझे लिखाणाचे कार्य पुष्कळ अल्प झाले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.३.२०२६)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वाढलेल्या झोपेविषयी उलगडलेले विश्लेषण

‘आध्यात्मिक उन्नतांची झोप ही सर्वसामान्य व्यक्तीसारखी नसून ती त्यांची सूक्ष्म स्तरावरील कार्याची स्थिती असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पुष्कळ झोप आणण्यामागील देवाच्या कार्यकारणभावाचा एक पैलू म्हणजे त्यांना स्थूल कार्याकडून अधिक सूक्ष्म कार्याकडे नेणे ! लिखाण करणे, त्याच्या चौकटी करणे, लेख लिहिणे यांसारखे कार्य हे स्थुलातील कार्य आहे. याउलट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना झोप आणून त्यांच्या मनात विचारच येऊ न देणे, थोडक्यात त्यांना निर्विचार स्थितीत ठेवून त्यांच्याकडून अधिक सूक्ष्म स्तरावरील कार्य, म्हणजे निर्गुणातील कार्य देव त्यांच्याकडून करवून घेत असेल.
तसेच ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा त्या स्थुलातील कार्यामध्ये वेळ न जाता त्यांना सूक्ष्मातील कार्यासाठी अधिक वेळ मिळावा’, हाही देवाचा उद्देश असेल. स्थुलापेक्षा सूक्ष्म आणि सगुणापेक्षा निर्गुण कार्य श्रेष्ठ अन् व्यापक असते. काळानुसार आता निर्गुणातील कार्याची अधिक आवश्यकता असावी. शेवटी ‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी म्हटलेच आहे ! ‘रामराज्य’ लवकर येण्यासाठीच देव हे सर्व करवून घेत आहे. देवाची लीला अगाध आहे !
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.३.२०२६)
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !