
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्यासारख्या थोर विभूतीच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे चैतन्यमय असे ज्ञानभांडार ! हे ग्रंथ लोखंडाचे सोने करणार्या परिसाप्रमाणे आहेत; कारण या ग्रंथांतील शिकवण आचरणात आणल्याने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र पालट झाले आहेत.

अनेक संत धर्म, अध्यात्म यांसंबंधी ग्रंथ लिहितात; पण धर्म, अध्यात्म यांच्यासह राष्ट्ररक्षण, हिंदु राष्ट्राची स्थापना, भाषाशुद्धी, सात्त्विक कला अशा विविधांगी विषयांवर ग्रंथ लिहिणारे सध्याच्या कलियुगातील गुरुदेव बहुधा एकमेवच संत असतील ! गुरुदेवांच्या अविश्रांत तळमळीमुळे मार्च २०२६ पर्यंत सनातनचे ३७० ग्रंथ-लघुग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, पंजाबी आणि नेपाळी या १३ भाषांत प्रसिद्ध झाले असून त्यांच्या १ कोटी २ लाख ४६ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत !
सनातनच्या ग्रंथांनी १ कोटीचा टप्पा पार करणे, ही सनातनच्या ग्रंथकार्यासाठी भूषणावह घटना आहे ! प्रकाशित प्रतींच्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते. गुरुदेवांच्या कृपेने आणि संकल्पाने सनातनचे ग्रंथकार्य असेच उत्तरोत्तर वाढत राहील, यात शंका नाही !’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (८.४.२०२६)
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठीसंपर्क : ९३२२३१५३१७ |
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष